प्रतिनिधी
मुंबई : केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्याच्या वाडा, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यांतील महिलांना स्वयंरोजगार मिळावा, या उद्देशाने येथील महिलांना मागच्यावर्षी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार येथील वनवासी महिलांनी ५० हजार राख्या बनविल्या. त्याच पद्धतीने यावर्षी केळीच्या खोडाच्या तंतूपासून ५ हजार राख्या बनविण्यात आल्या आहेत. eco friendly rakhi from keshavsushtri
केळीच्या खोडापासून मिळणार तंतू मऊसूत असतो. तसेच तो चांगल्याप्रकारे फोल्डही करता येतो. या अनुषंगाने या राख्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. राख्या बनविण्यापूर्वी जून महिन्यात केळीच्या खोडापासून तंतू काढण्याचे काम सुरु झाले. या तंतूंना रंग देणेही सोयीस्कर असल्यामुळे या राख्या रंगीबेरंगी आणि आकर्षक पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २ हजार राख्या तयार झाल्या असून आणखी ३ हजार राख्यांचे काम सुरु असून लवकरच ते पूर्णत्वास येईल. या राख्यांप्रमाणेच यावर्षी २५ हजार बांबूच्या राख्या बनविल्या जात आहेत.
पर्यावरणपूरक असणाऱ्या या राख्या घेण्यासाठी सर्व देशातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राख्यांची उत्तम विक्री सुरु आहे. संपूर्ण देशभरातून या राख्यांना मागणी असून या राख्या कुरिअर द्वारे घरपोच पाठविल्या जातात. २ राख्यांचा संच असलेल्या राख्यांचे पॅकेट १०० रुपयांचे आहे. अधिक माहितीसाठी वैभव बागुल (७७३८२७७५८२) यांच्याशी संपर्क साधावा. www.keshavkutir. com या वेबसाईट द्वारे इच्छुक आपली राखी मागवू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App