विशेष प्रतिनिधी
पुणे: इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे राहण्यायोग्य शहरात पुणे शहर देशात नंबर वन ठरले आहे. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने पहिल्यांदाच देशात राहण्यायोग्य इज आफ लिव्हिंग इंडेक्स ही 111 शहरांची यादी घोषित केली. नवी मुंबई व मुंबई अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. Ease of Living Index, Pune number one in the country in livable cities
राहण्यायोग्य शहरांची ही निवड 78 संकेतस्थळावर 100 गुणांच्या आधारे केली आहे. यामध्ये सहकार, सामाजिक, आर्थिक, पायाभूत सोयी-सुविधा या आधारावर तयार करण्यात आली आहे. यामध्ये गव्हरनन्स, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, आर्थिक स्तर, रोजगार, कचऱ्याची विल्हेवाट, पर्यावरण प्रदूषण, राहण्याचा स्तर, वीज वितरण, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, नागरिकांना फिरण्यासाठी गार्डन किंवा मोकळी जागा या बाबींचाही विचार करण्यात आला आहे.
ठाणे हे सहाव्या स्थानावर आहे. म्हणजेच टॉप टेन शहरात महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश झाला आहे. टॉप टेन शहरात पुणे, नवी मुंबई, मुंबई सह 4) तिरूपती (आंध्र प्रदेश), 5) चंदीगड, 6) ठाणे (महाराष्ट्र), 7) रायपूर (छत्तीसगड), 8) इंदौर (मध्य प्रदेश), 9) विजयवाडा (आंध्र प्रदेश), 10) भोपाळ (मध्य प्रदेश) या शहरांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App