पतीला मित्रांच्या मदतीने मारहाण करून पत्नीचाच पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न


विशेष प्रतिनिधी

पुणे : पतीला मित्रांच्या मदतीने मारहाण करून पत्नीनेच पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. Wife tries to commit suicide by drinking phenyl at the police station

पती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. त्याच्यापाठोपाठ पोलीस ठाण्यात आलेल्या पत्नीने पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी स्वतः फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यात घडली. आफरीन उमर शेख (वय 21 रा. नवाजिश पार्क, कोंढवा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे.



आफरीन आणि तिच्या पतीमध्ये मंगळवारी भांडणे झाली. उमरला तिच्या चारित्र्याविषयी संशय होता. यावरून त्यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. मंगळवारी पुन्हा त्यांच्यामध्ये भांडणे झाली. यावेळी आफरीन आणि तिच्या दोन मित्रांनी उमरला मारहाण केली.

मारहाणीची तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात त्याने धाव घेतली. त्याची पत्नीही पोलीस ठाण्यामध्ये आली. तेथे वाद झाल्यानंतर तिने सोबत आणलेले फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Wife tries to commit suicide by drinking phenyl at the police station

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”