दुर्गम भागात कोरोनावरील लस, औषधे पोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करा – पंतप्रधान मोदी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – दुर्गम भागात कोरोना प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. हिमाचल प्रदेशातील आरोग्य कर्मचारी आणि लस लाभार्थ्यांशी संवाद साधताना मोदींनी हिमाचल प्रदेशाच्या दुर्गम भागात ड्रोनचा वापर औषध वितरणासाठी करता येईल, असे प्रतिपादन केले.  Drone can be used for vaccine distribution

मोदी म्हणाले, की केंद्र सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित नियम सुलभ केले आहे. यामुळे हिमाचल प्रदेशाच्या दुर्गम भागात ड्रोनचा वापर औषध वितरणासाठी करता येईल. यासोबतच जंगलाच्या संरक्षणासाठी हिमाचल प्रदेशात या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. राज्यात जमिनीच्या सर्वेक्षणासाठी हे तंत्रज्ञान वापरले जात आहे.



पंतप्रधान म्हणाले, की हिमाचल प्रदेश भारतातील पहिले राज्य बनले आहे, जेथे कोरोना प्रतिबंधक लशीसाठी पात्र संपूर्ण लोकसंख्येला किमान एक डोस मिळाला आहे. तर जवळपास एक तृतीयांश लोकसंख्येला दुसरा डोस मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसचे शंभर टक्के वितरण करण्यात हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती हा दुर्गम जिल्हा अग्रगण्य असल्याचेही प्रशस्तीपत्र पंतप्रधानांनी दिले.

Drone can be used for vaccine distribution

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub