आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTOला चकरा मारण्याची गरज नाही, NGO आणि ऑटो कंपनीदेखील देऊ शकणार परवाने

Driving License New Rules 2021 Driving License New Rules In India Auto Makers, NGOs Allowed To Run Driver Training centres

Driving License New Rules : केंद्र सरकारने मागच्या काही काळापासून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याचबरोबर आता सरकारने या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. सरकारच्या नवीन नियमानुसार, वाहन उत्पादक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी कंपन्यांना प्रशिक्षण केंद्रे चालवण्याची परवानगी असेल. प्रशिक्षणानंतर हे सर्व ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यास सक्षम असतील. Driving License New Rules 2021 Driving License New Rules In India Auto Makers, NGOs Allowed To Run Driver Training centres


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागच्या काही काळापासून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्याचबरोबर आता सरकारने या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. सरकारच्या नवीन नियमानुसार, वाहन उत्पादक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी कंपन्यांना प्रशिक्षण केंद्रे चालवण्याची परवानगी असेल. प्रशिक्षणानंतर हे सर्व ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यास सक्षम असतील.

यांना असेल लायसन्स देण्याची परवानगी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यानुसार ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यासाठी नवीन सुविधेसह प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) द्वारे ड्रायव्हिंग लायसन्सदेखील जारी केले जातील. मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, फर्म, एनजीओ, खासगी कंपन्या, ऑटोमोबाइल असोसिएशन, वाहन उत्पादक संघटना, स्वायत्त संस्था, खासगी वाहन उत्पादक यासारख्या वैध संस्था ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांच्या मान्यतेसाठी अर्ज करू शकतील.

हे आहे गरजेचे

मंत्रालयाने निवेदनात पुढे म्हटले आहे की, या वैध घटकांना केंद्रीय मोटार वाहन (सीएमव्ही) नियम, 1989 अंतर्गत विहित केलेल्या जमिनीवर आवश्यक सुविधा असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर जर कोणी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात यासाठी अर्ज केला तर त्याला संसाधनाचे व्यवस्थापन करण्याची आपली आर्थिक क्षमता दाखवावी लागेल.

वार्षिक अहवाल सादर करावा लागेल

केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार, राज्य सरकारांना अशा चालक प्रशिक्षण केंद्रांना मान्यता देण्याच्या पद्धतीव्यतिरिक्त इतर माहिती प्रसारित करावी लागेल. सरकारच्या मते, ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर उघडण्याची प्रक्रिया अर्ज केल्याच्या 60 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागते. या प्रशिक्षण केंद्रांना त्यांचे वार्षिक अहवालही सादर करावे लागतील. जे आरटीओ किंवा डीटीओमध्ये जमा करता येतील.

Driving License New Rules 2021 Driving License New Rules In India Auto Makers, NGOs Allowed To Run Driver Training centres

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात