महाराष्ट्र एटीएस झोपलय का? आशिष शेलार यांचा सवाल; दिल्ली पोलिसांनी धारावीतून दहशतवाद्याला केली अटक

वृत्तसंस्था

मुंबई : नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना षडयंत्र रचले जात असताना महाराष्ट्र एटीएस झोपलय का? पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलय का? असा सवाल भाजप नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. Did Maharashtra ATS sleep while the conspiracy was being hatched? , Ashish Shelar’s question; Delhi Police arrest terrorist from Dharavi

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. शेलार म्हणाले, नॅान कॅाग्निजेबल ॲाफेन्समध्ये केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस आणि पत्रकारांना हात नाही तर पाय सुद्धा लावू ,अशी भाषा करणारे पोलिस अधिकारी, विद्यमान आमदाराला लुकआउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलिस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते. हे गृहमंत्री स्पष्ट करतील का?या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका अस तर राजकीय प्रकार नाही ना ? असा सवाल त्यांनी केला. पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पोलिसांच लक्ष नको तेथे गुंतविल्याचा परिणाम

आता सरकार बैठका घेतल्या असल्या तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राजकर्ते पोलिसांच लक्ष नको त्या विषयात घालतात मग अशा घटना घडतात. आमचे पोलिस सक्षम आहेत पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी, आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली असेही ते म्हणाले. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, आवाहन ॲड. शेलार यांनी केले आहे.

  •  महाराष्ट्र एटीएस झोपलय का?
  •  हिंदू सणांमध्ये घातपात करण्याचे षडयंत्र उघड
  •  दिल्ली पोलिसांनी लावला छडा
  •  जान मोहम्मद शेखला धारावीतून केली अटक
  • इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्री भूमिका स्पष्ट करावी
  •  आमदाराला लुकआउट नोटीस, दहशतवादी मोकाट
  •  पोलिसांच लक्ष नको तेथे गुंतविल्याचा परिणाम
  •  अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही

Did Maharashtra ATS sleep while the conspiracy was being hatched? , Ashish Shelar’s question; Delhi Police arrest terrorist from Dharavi

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात