केंद्र सरकारने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. राज्य त्यात भर घालत आहे. महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारेल, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Devendra Fadnavis believes vaccine availability will improve by June
विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्र सरकारने लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. राज्य त्यात भर घालत आहे. महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारेल, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पुण्यातील नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लँटचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोनाच्या तिसºया लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजनची कमतरता आपल्याला जाणवली. देशात उपलब्ध सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी द्यावा लागला. प्रशासनाला तणावात राहावे लागत होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या परिस्थितीत संपूर्ण व्यवस्था केली. पंतप्रधानांचा पुढाकाराने देशात ८०० ऑ क्सिजन प्लॅँटरची निर्मिती होत आहे.
फडणवीस म्हणाले, या लाटेत सर्वाधिक परिणाम झालेल्या ठिकाणांमध्ये पुणे होते. इतका ताण असूनही पुण्याने टेस्टिंग कमी होऊ दिलं नाही. आत्ता संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या जो गोंधळ सुरू आहे त्यावरून काही मार्ग काढला पाहिजे. चांगले काय करता येईल ते पाहिले पाहिजे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, थेट अमेरिकेतून या ऑ क्सिजन प्लांट साठी साहित्य आणले आहे. पुढची लाट आलीच तर महापालिका आत्मनिर्भर होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App