पत्रकार, कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा ; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना पत्र


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय.Declare journalists, cameramen as frontline workers; Devendra Fadnavis’s letter to the Chief Minister

राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तातडीने फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करा आणि लसीकरणात सहभागी करून घ्या असं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे.

लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावं लागतं. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावं लागतं. यासंदर्भातील निर्णय तत्काळ घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असं असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यासंदर्भातील निर्णय तत्काळ आणि विनाविलंब करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Declare journalists, cameramen as frontline workers; Devendra Fadnavis’s letter to the Chief Minister

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात