विशेष प्रतिनिधी
मुंबई – सकाळी देवेंद्र फडणवीस – ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्वर ओकवर झालेली भेट आणि सायंकाळी खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे आलेले ट्विट यातून एक राजकीय बाब स्पष्ट होतेय… उध्दव ठाकरेंची विकेट आता हिट होताना दिसतेय. devendra fadanavis – sharad pawar meeting and MP sambhaji raje`s twitte political sticky ground for uddhav thackeray
कोविडचा कहर, अनैतिक संबंध आणि खंडणीखोरीतून मंत्र्यांचे राजीनामे, त्यातून ठाकरे सरकारची पुरती बदनामी झाली असताना विविध सर्वेंमधून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे लोकप्रिय नेते असल्याचे भास निर्माण होणे हे शरद पवारांना अस्वस्थ करून गेले आहे. पवारांची गणिते गेल्या काही फसल्याची भावना तयार झाली आहे.
यातून ठाकरे – पवार यांच्यात बेबनाव झाल्याच्या बातम्याही फिरल्या आहेत. उध्दव ठाकरे हे सुधाकरराव नाईक यांच्या वळणावर चालल्याची पवारांची भावना झाली असल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण पवारांचा राजकीय दबाव त्यांनी झुगारल्याच्या बऱ्याच गोष्टी गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आल्या आहेत.
त्यातच मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर अहमदाबादला गौतम अदानींच्या घरी पवारांची बैठक झाल्याची बातमी आली होती. तिला प्रफुल्ल पटेल उपस्थित असल्याचेही सांगण्यात आले होते.
या सगळ्या बाबींचा लॉजिकल पोलिटिकल एन्ड जवळ येतोय काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती जवळ येऊ घातल्याची ठळक चिन्हे आज दिसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सकाळची देवेंद्र फडणवीस – शरद पवार भेट आणि सायंकाळचे खासदार संभाजी राजे यांचे ट्विट या दोन्ही बाबी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची हिट विकेट जाण्याचे निदर्शक असल्याचे मानले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App