विश्वविक्रम…!! सातारा : एका दिवसात ४० किलोमीटर रस्ता ; ३९० कर्मचारी ;लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद; राजपथ इन्फ्राकॉनची कामगीरी


विशेष प्रतिनिधी

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला. महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. या अनोख्य विक्रमाबद्दल राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली.  WORLD RECORD..! Satara: 40 km road in one day; 390 employees; entry in Limca Book of Records; Performance of Rajpath Infracon

यामध्ये २५.५४ कि. मी. रस्ता हा अवघ्या १४ तासात पूर्ण करून विजापूर-सोलापूर २५.५४ कि.मी. रस्त्याचा विक्रमही मोडला असून नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे. हे काम ३ शिफ्टमध्ये एकाच वेळी ६ ठिकाणी करण्यात आले.

यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५ अभियंत्यांनी काम पाहिले. उद्योजकामार्फत ६० अभियंते, ४७ पर्यवेक्षक, २३ गुणवत्ता नियंत्रक अभियंते, १५० वाहनचालक, ११० मजूर असे एकूण ३९० कर्मचाऱ्यांद्वारे काम करण्यात आले.

गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन एक्सट्रॅक्टर, बिटुमिन पेनीट्रोमीटर, केंबरप्लेंट, सिव्हस् यासारखे साहित्य वापरण्यात आले. तसेच या कामासाठी ८ मॉडर्न बॅचमिक्स प्रकारे हॉटमिक्सर प्लॅन्ट, ७ मॉर्डन सेन्सर पेव्हर, १२ व्हायब्रेटरी रोल, ६ न्युमॅटीक रोलर १८० डंपर (हायवा) व अन्य यंत्रसामग्रींचा वापर करण्यात आला. १,१०० मे. टन डांबर व ६,००० घनमीटर खडीचा वापर करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे,  आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. हा उपक्रम कौतुकास्पर असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील अभियंते व उद्योजक, कंत्राटदार यांच्यासाठी दिशादर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

असा झाला विक्रम –

या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले. 

३० किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले.

प्रत्येक भागातील काम करण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत होती.

या कामासाठी एकूण ११,००० मेट्रिक टन बिटुमन काँक्रिट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते.

काँक्रिटचे हे मटेरिअल पसरविण्यासाठी सहा पेव्हर, १२ टँडम रोलर व सहा पीटीआर वापरण्यात आले.

या मटेरिअलची ने-आण करण्यासाठी एकूण १८० हायवा टिप्पर वापरण्यात आले.

प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्वाॅलिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते.

एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पूर्ण कामासाठी तैनात होते.

यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.

WORLD RECORD..! Satara: 40 km road in one day; 390 employees; entry in Limca Book of Records; Performance of Rajpath Infracon

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात