भारतातील डिजीटल क्रांती आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात झालेल्या क्रांतीचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी कौतुक केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे डिजीटल पेमेंटचे प्रमाण वाढून भारतातील भ्रष्टाचार कमी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
सिंगापूर : भारतातील डिजीटल क्रांती आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात झालेल्या क्रांतीचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी कौतुक केले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे डिजीटल पेमेंटचे प्रमाण वाढून भारतातील भ्रष्टाचार कमी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. Denomination Bill Gates latest news
सिंगापूर फिन्टेक फेस्टिव्हलमध्ये बोलताना गेटस म्हणाले की, चीन सोडून इतर लोक सध्या एका देशाचा अभ्यास करत असतील तर त्यांनी भारताकडे पाहावे. भारतात अनेक नानिवन्यपूर्ण गोष्टी घडत आहेत. त्याचा व्यवस्था सुधारण्यासाठी उपयोग होत आहे. नाविन्यपूर्वक आर्थिक योजनांद्वारे भारताने सामान्यांच्या जीवनात क्रांती घडविली. भारतातील मुक्त स्त्रोत्र तंत्रज्ञानाचा वापर इतर देशांसाठी करणार आहे.
भारताने डिजीटल क्रांतीसाठी वापरलेल्या मॉडेलचा बिल गेटस फाऊंडेशनच्या माध्यमातून इतर देशांसाठीही वापर केला जाणार असल्याचे सांगून बिल गेटस म्हणाले की, भारताने जगातील सर्वात मोठा बायोमेट्रिक डाटाबेस तयार केला आहे. कोणत्याही बॅँक किंवा स्मार्टफोन अॅपमध्ये पैसे पाठविण्याची व्यवस्था असणारा डिजीटल प्लॅटफॉर्म यामुळे विकसित झाला आहे. डिजीटल क्रांतीमुळे चीनी व्हायरस महामारीच्या काळात गरीबांना खूप मदत झाली. त्यांना मदतीचे वाटप करणे शक्य झाले. त्यामुळे होणारे वादही कमी झाले. या धोरणांमुळे गरिबांना मदत वाटपाचा खर्च आणि भांडण विशेषत: साथीच्या साथीच्या काळात कमी झाले आहे.
गेटस म्हणाले की, २०१६मध्ये भारतामध्ये सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. उच्च मूल्याच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्यामुळे रोख रकमेचा वापर करणे कमी झाले. त्याचबरोबर डिजीटल पेमेंटची पध्दत आणण्यात आली. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, यूपीआय यांचा वापर वाढला. त्याचबरोबर स्मार्टफोनचा वापर वाढला. त्याचबरोबर जगातील सर्वात कमी दराने डाटा भारतीयांना मिळू लागला. अनेक कंपन्यांनी आपले यूपीआय प्लॅटफॉर्म वापरतात. त्यामुळे फेसबुक, अॅमेझॉन डॉट इंक, वॉलमार्ट इंक, पेटीएम यांच्यामार्फत पैसे पाठविता येतात. त्यासाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App