भाजपाचे मिशन मुंबई : जे. पी. नड्डा घेणार तीन दिवस मॅरेथॉन बैठका


हैदराबाद महापालिकेतील दणदणीत यशानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन मुंबई सुरू केले आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी रणनिती ठरविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत तीन दिवस मॅरेथॉन बैठका घेणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हैदराबाद महापालिकेतील दणदणीत यशानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन मुंबई सुरू केले आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी रणनिती ठरविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत तीन दिवस मॅरेथॉन बैठका घेणार आहेत.

J. P. Nadda latest news

जेपी नड्डा 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. तीन दिवस नड्डा हे मुंबईतच तळ ठोकणार आहेत. यावेळी ते महाराष्ट्रासह मुंबईतील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणार आहेत.

भाजपाचे केरळमध्ये सोशल इंजिनिअरींग, मुस्लिम-ख्रिश्चनांना उमेदवारी देत नसल्याचा दावा काढला खोडून

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मॅरेथॉन बैठका घेऊन अनेक सूचना करणार आहेत. यावेळी ते मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक, आमदार आणि खासदारांशीही संवाद साधणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच भाजपच्या मुंबई कार्यकारिणीने निवडणुकीची काय तयारी केली आहे याचाही आढावा ते घेणार आहेत.

हैदराबादमध्ये भाजपचे अवघे चार नगरसेवक होते. त्या बळावर भाजपने हैदराबादमध्ये 49 नगरसेवक निवडून आणले. हैदराबादच्या पालिका निवडणुकीत वापरण्यात आलेले प्रचाराचे हातखंडे, उमेदवारांची निवड, स्थानिक पातळीवरील समस्यांवरून उठवलेले रान आणि विभागनिहाय करण्यात आलेली बांधणी आदी गोष्टींचा मुंबई महापालिका निवडणुकीत उपयोग होऊ शकतो का? यावरही ते मुंबईतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

J. P. Nadda latest news

गेल्या वेळी मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला कडवी झुंज दिली होती. भाजपाला शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी मिळाल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक फोडून बहुमत मिळविले होते. मुंबईत गेल्या वेळच्या निवडणुकांत भाजपा कोठे कमी पडली याचा आढावाही नड्डा घेणार आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात