वृत्तसंस्था
रत्नागिरी : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ निर्माण झालेल्या ‘ताऊत ’चक्रीवादळाने आता दिशा बदलली असून त्याचा रोख कोकण, गोवा किनारपट्टीकडे आहे. ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळ तीव्र स्वरूपाचे असून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Cyclone Changed the directions and heading towards konkan and Goa Sea shore. Stormy wind expected with heavy rain in state
दक्षिण कोकणसह गोवा किनाऱ्यावर 15 व 16 मे रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. वादळी वारे कोंकण आणि गोवा किनारपट्टीवर थडकणार असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावर जणवणार आहे.
जोरदार वाऱ्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वास्तविक हे चक्रीवादळ रत्नागिरी समुद्र किनाऱ्यापावून दूर अंतरावरून जाणार होते. त्याचा रोख हा पाकिस्तानातील कराची किनारपट्टीकडे यापूर्वी होता. आता वादळाने दिशा बदलल्यामुळे त्याचा रोख भारतीय किनारपट्टीकडे झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App