मुंबईत कोरोना काळात गुन्ह्यांत वाढ, महिला सर्वाधिक असुरक्षित

विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोना आणि लॉकडाऊनचा सामना नागरिकांना करावा लागत असला, तरी यामुळे महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांत घट झालेली नाही. उलट मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईमध्ये २,६११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. Crime increased in Mumbai during lockdown

मागील दोन वर्षे मुंबईकर विविध निर्बंधांमुळे अडचणीत आलेले आहेत. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांना बंद झाल्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच आता मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महिला संबंधित गुन्ह्यांत वाढ झाली आहे.



मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत सुमारे १,९९५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. चालू वर्षी जानेवारी ते जून यामध्ये २,६११ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा ६१६ गुन्हे वाढले आहेत.

यापैकी ४७५ फौजदारी फिर्यादी या बलात्काराच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत. यात ३६१ प्रकरणांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले आहे. तसेच यात अल्पवयीन मुलांसंबंधित गुन्हे २८२ असून २५३ प्रकरणांचा तपास पोलिसांनी लावला आहे.

Crime increased in Mumbai during lockdown

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात