वृत्तसंस्था
आंबोली : राज्यात लॉकडाऊन वाढविल्याचे घोषित झाले असताना सरकारने प्रवासासाठी ई पासची अट लागू केली आहे. पण, क्रिकेटपटू पृथ्वी शाह याला मित्रांसमवेत गोव्याला जाताना आंबोली पोलिसांनी रोखले. चौकशीत त्याच्याकडे पास नसल्याचे आढळले होते.Cricketer Pruthvi show is not permitted for travel to Goa. Because he had no E travel pass.
पृथ्वी शॉ हा मोटारीने मित्रांसोबत मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याला जात होता. आंबोली पोलिसांनी ई-पासची मागणी केली. ई-पास नसल्याने पुढील प्रवास करता येणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
यानंतर पृथ्वी शॉने मोबाइलवरुन ई-पाससाठी अर्ज केला. एका तासात त्याला ई-पास मिळाला.नंतरच त्याला पुढे जाण्याची परवानगी मिळाली.
पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली संघातून खेळत होता. कोरोनामुळे स्पर्धा स्थगित झाली आहे. अनेक क्रिकेटर्स कुटुंबासोबत वेळ घालवत असताना पृथ्वीने मित्रांसोबत गोव्याला जाणं पसंत केलं. मात्र, नियमांचं पालन न करणं त्याला महागात पडलं. पास नसल्याने तासाहून अधिक वेळ मोटारीमध्येच थांबावं लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App