वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील ७९ टक्के नवे रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again
केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. दोन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासांत, देशात ४४ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित समोर आले आहेत. तर ४९६ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर ३२,९८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून आहेत. म्हणजेच देशातील ७९ टक्के नवे कोरोना रुग्ण या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत.
केरळमध्ये ३१ हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत, तर १५९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख ४४ हजारांच्या पुढे गेली आहे. यातच, कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता असून ती नोव्हेंबरमध्ये पीकवर असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
देशातील कोरोना स्थिती
या पाच राज्यांत सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App