कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही, ही लस काही आठवड्यांत तयार होईल, अशी चांगली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लसीसाठी जास्त काळ प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही, ही लस काही आठवड्यांत तयार होईल, अशी चांगली बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
लस कंपन्यांशी चर्चेनंतर झालेल्या पहिल्याच सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले की, भारताच्या वैज्ञानिकांना त्यांच्या यशाविषयी विश्वास आहे आणि त्यांचा आत्मविश्वास मजबूत आहे. कमी किमतीच्या सर्वात सुरक्षित लसीवर जगाचे लक्ष लागून आहे. corona vaccine news
साहजिकच जगाची नजर भारताकडेही आहे. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद येथे जाऊन पाहिले की लस उत्पादनाच्या तयारी कशी आहे, याची पाहणी मोदी यांनी नुकतीच केली होती. जागतिक इंडस्ट्रीच्या दिग्गजांसोबत ताळमेळ बसवला जात आहे. भारतीयांना लस देण्यासाठीची सर्व तयारी केली जात आहे. अशा जवळपास ८ संभाव्य लशी आहेत, ज्या चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. या भारतातच तयार केल्या जात आहेत. corona vaccine news
भारतात संशोधन होणाऱ्या स्वत:च्या 3 वेगवेगळ्या लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घेण्यात आल्या. एक्सपर्ट मानत आहेत की लसीसाठी जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही. पुढील काही आठवड्यांमध्ये ही लस तयार होईल. वैज्ञानिकांचा ग्रीन सिग्नल मिळताच लसीकरण सुरू होईल.
पहिल्या टप्प्यात ही लस कोणाला मिळणार, या संदर्भात केंद्र राज्यांच्या सूचनांवरही काम करत आहे. आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि आधीच गंभीर आजारांनी ग्रस्त वृद्धांना प्राधान्य दिले जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, भारताने एक विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे ज्यामध्ये कोरोना लसीतील लाभार्थ्यांना लसीशी संबंधित वास्तविक माहिती मिळू शकेल. कोरोना लसीशी संबंधित मोहिमेची जबाबदारी राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडे देण्यात आली आहे. हा गट राज्य सरकारांसोबत काम करत आहे. या गटातून राष्ट्रीय व स्थानिक गरजांनुसार निर्णय घेण्यात येतील.
आपण केवळ आपल्याच नागरिकांची काळजी घेतली नाही तर इतर देशांना मदत करण्याचे कामही केले आहे. फेब्रुवारी-मार्चमधल्या संभ्रमित वातावरणापासून ते सध्याच्या डिसेंबरच्या विश्वास आणि अपेक्षेच्या वातावरणापर्यंत भारताने दीर्घ प्रवास केला आहे. आता जेव्हा आपण लसीच्या जवळ आलो आहेत तसेच समान सहभाग, सहकार्य भविष्यात खूप महत्वाचे आहे.
तुम्हा सर्व अनुभवी साथिदारांच्या सूचना देखील यात एक भूमिका बजावतील. जेव्हा एवढी मोठी लसीकरण मोहीम चालू होते तेव्हा समाजात अनेक अफवा पसरवल्या जातात. ते जनहित आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात आहे. देशातील नागरिकांना जागरूक करणे आणि अफवांपासून त्यांचा बचाव करणे ही सर्व पक्षांची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App