प्रतिनिधी
मुंबई – कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती अद्याप कायम आहे. राज्यांत काही शहरांमध्ये नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या यादीत पुणे, ठाणे, अहमदनगरपाठोपाठ मुंबईत सर्वाधिक म्हणजे ५ हजार ३९३ सक्रिय रुग्ण आहेत. Corona patients increasing in some districts
राज्यात १४ सप्टेंबरपर्यंत ४९ हजार ६७१ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी मुंबईत १०.८६ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या महिन्यात सक्रिय रुग्णांच्या बाबतीत मुंबई पाचव्या क्रमांकावर होती; मात्र सध्या शहरात नव्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे.
दरम्यान, राज्यात १७ सप्टेंबर २०२० पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाख ०१ हजार ७५२ होती; मात्र दुसऱ्या लाटेत ही संख्या दुपटीने वाढत २२ एप्रिल २०२१ पर्यंत ती सहा लाख ९९ हजार ८५८ वर पोहोचली; परंतु १४ सप्टेंबरपर्यंत राज्यात २०२१ पर्यंत ४९ हजार ६७१ सक्रिय रुग्ण आहेत.
एकूण ४९ हजार ६७१ सक्रिय रुग्णांपैकी ३,०२६ म्हणजेच जवळपास ६.०७ टक्के रुग्ण सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत; तर १५.२८ टक्के म्हणजेच ७ हजार ६२० हे गंभीर अवस्थेत असून या सर्वांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.
Corona patients increasing in some districts
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App