हातचं सोडून पळत्याच्या पाठी; लखीमपूरमध्ये फसतेय काँग्रेसची नीती!!


“हातचं सोडून पळत्याच्या पाठी” अशी सध्या काँग्रेसची अवस्था झाली आहे. काँग्रेसची राजवट असणाऱ्या एका पाठोपाठ एक राज्यांमध्ये काँग्रेसचेच नेते बंड करून उठले आहेत. त्या बंडखोरांकडे नीट लक्ष देऊन त्यांचा “बंदोबस्त” करण्याऐवजी काँग्रेसचे बहीण – भाऊ नेते उत्तर प्रदेशाकडे वळले आहेत.Congress will loose not only UP but Punjab and Chattisghad

आता बहीण – भाऊच उत्तर प्रदेशाकडे वळले आहेत, म्हटल्यानंतर आपल्या राज्यातल्या काँग्रेसचे काय व्हायचे ते होवो, असे म्हणून छत्तीसगड, पंजाब, राजस्थान या काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यांमधले काँग्रेसचे वरिष्ठ आणि कनिष्ठ नेते बहीण – भावांची मर्जी संपादन करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या दिशेने धावले आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलून देखील तिथला काँग्रेस मधला तिढा नीट सुटलेला नाही. तो सोडवायचे बाजूला सारून ज्या नेत्यामुळे हा तिढा वाढला, ते नवज्योत सिंग सिद्धूच पंजाबला बाजूला टाकून लखीमपूरला धावले आहेत. त्यांच्या आधी प्रियांका गांधी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील लखीमपूरला धावले.

लखीमपूरला पोहोचण्याच्या आदल्या दिवशी या नेत्यांनी लखनऊ विमानतळावर राजकीय नौटंकी करून घेतली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल लखनऊच्या विमानतळावर आणि त्यांच्या राज्यात दंगल भडकून गावेच्या गावे कर्फ्यू मध्ये अशी स्थिती झाली. स्वतःच्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे सोडून भूपेश बघेल यांनी लखनऊत विमानतळावर ठिय्या मांडला. त्यांच्या विरोधातले आमदार आठवडाभरासाठी दिल्लीवारी देखील करून आले. आता त्यांची दिल्लीवारी झालीच आहे, तर निदान प्रियांका गांधी यांची मर्जी टिकावी यासाठी बघेल यांनी “लखनऊ विमानतळ ते लखीमपूर” अशी राजकीय नौटंकी करून घेतली. छत्तीसगडमधल्या काँग्रेसच्या नेतृत्वाचे काय व्हायचे ते होवो आपण प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर असलो की झाले अशा स्वरूपाचे बघेल यांची राजकीय वर्तन होते.



जे बघेल यांचे तेच चरणजीत सिंग चन्नी यांचे. ते राहुल आणि प्रियांका यांच्याशी जवळीक साधता आहेत हे पाहिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या डोक्यातली “राजकीय ट्यूब” पेटली. त्यांनी एक हजार गाड्यांचा ताफा घेऊन पंजाब सोडून उत्तर प्रदेशाकडे प्रयाण केले. पण अगोदर हरियाणात आणि नंतर उत्तर प्रदेश मध्ये त्यांच्या गाड्यांना अटकाव करण्यात आला. लखीमपूरला पोचायचे तेव्हा पोहोचू, राजकीय नौटंकी तर पूर्ण झाली असेच त्यांची वर्तणूक होती…!!

चरणजीत सिंग चन्नी यांनी यांच्यावर राहुल आणि प्रियांका भाऊ-बहिणीची जर मर्जी बसली तर आपली प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची देखील धोक्यात येऊ शकते, याचा अंदाज सिद्धू यांना आल्यानंतर त्यांनी आपल्या गाड्यांची दिशा उत्तर प्रदेश कडे वळवली, हे सांगायला कोणत्या राजकीय ज्योतिषाची गरज नाही.

ही झाली आपापली राज्य सोडून उत्तर प्रदेशमध्ये धावणाऱ्या नेत्यांची कहाणी. पण खुद्द राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका पाठोपाठ एक नेते काँग्रेस सोडून चालले आहेत. तिथे राजकीय डागडुजी करायचे सोडून राहुल गांधी आपली बहीण प्रियांका हिच्या भेटीला सीतापूरला गेले. वायनाड मधली गळती सीतापूरमध्ये जाऊन थांबणार असती, तर आणखी काय हवे होते!! गेले तीन दिवस एकापाठोपाठ एक नेते काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. जिग्नेश मेवाणी आणि कन्हैया कुमार या दोन नेत्यांच्या काँग्रेस प्रवेश सोडला तर बाकी कुठलेही मोठे राजकीय कर्तृत्व राहुल गांधींनी दाखवलेले दिसले नाही. हे म्हणजे असे झाले, “मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा”…!!



दोन्ही बहीण – भावंडांनी आपले “राजकीय लक्ष्य” उत्तर प्रदेशावर केंद्रित केल्याने प्रत्यक्षात तिथे काय मिळायचे हे अजून ठरायचे आहे. चौथ्या नंबरच्या पक्षाचे भवितव्य असून असून किती मोठे असणार?, याविषयी अजून कोणालाच अंदाज नाही. तरी देखील दोन्ही बहीण-भावंडे आपली सर्व राजकीय प्रतिष्ठा तेथे पणाला लावत आहेत. जिथे आपल्या पक्षाची राजवट आहे तिथे नीट राज्य करायचे सोडून राज्यांचे मुख्यमंत्री देखील बहीण भावंडंमागे धावत आहेत. तिथेच ते “हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे” लागल्याचे चित्र दिसत आहे.

फक्त उत्तर प्रदेशातच नाहीतर पंजाबमध्येही त्याच वेळी निवडणूक आहे. चरणजीत सिंग चन्नी हे नवे मुख्यमंत्री आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे नवे आव्हान त्यांच्यापुढे नव्याने उभे राहत आहे. अशा वेळी पंजाबवर लक्ष केंद्रित करायचे सोडून ते फक्त बहीण – भावाची मर्जी संभाळायला लागले, तर पंजाबमध्ये काँग्रेसचे “कल्याण” झाल्याशिवाय राहणार नाही.

भूपेश बघेल यांच्याकडे उत्तर प्रदेशाची प्रभारी पदाची जबाबदारी देऊन त्यांना छत्तीसगडमधून बाजुलाच काढण्याचे काँग्रेसमध्ये घाटत आहे. उत्तर प्रदेशमध्ये यश मिळेल की नाही माहीत नाही, पण असल्या उफराट्या कारभाराने छत्तीसगड मात्र हातचे जाईल, अशी स्थिती आहे. म्हणूनच म्हटले आहे की काँग्रेस नेते हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागले आहेत…!!

Congress will loose not only UP but Punjab and Chattisghad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात