विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोना विरोधातील लढाईत सारा देश एकजूटीने सामील झालेला असताना काँग्रेसचे नेते मात्र “वेगळ्याच वळणाने” निघाल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राजकीय अजेंडा चालवताना काँग्रेसचे नेते आणि थिंकटँक हे भारत विरोधी अजेंडा चालविण्यापर्यंत जाऊन ठेपलेत.
Congress Tollkit Exposed; party targets modi, gujrat, hindu, ganga
भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस विजया रहाटकर यांनी आपल्या ताज्या फेसबुक पोस्टमध्ये त्याचे वर्णन काँग्रेसचे Tollkit असे केले आहे. मध्यंतरी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अचानक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी पुढे आल्या होत्या. त्यातून सुरूवातीला शेतकरी आंदोलनाला प्रचंड पाठिंबा तयार झाल्याचे चित्र निर्माण केले गेले होते. मात्र, यातल्या आंतरराष्ट्रीय Tollkit च्या षडयंत्राचा फुगा फुटला आणि मग आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी थंड पडले.
काँग्रेसचे आणि त्यांच्या थिंकटँकचे Tollkit असेच Expose झाले आहे. काँग्रेसने कुंभ मेळ्याला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हटले, तर ईद मिलनला हॅपी सोशल गॅदरिंग असे संबोधले. कोरोनाच्या एका स्ट्रेनला “इंडियन स्ट्रेन” असे संबोधले आणि ते WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या नावावर खपविले. अर्थात संघटनेने असा शब्दप्रयोग वापरला नसल्याचा खुलासा ताबडतोब करून काँग्रेसच्या थिंकटँकचे पितळ उघडे पाडले.
त्याचवेळी काँग्रेसच्या थिंकटँकने सेंट्रल व्हिस्टाचा बांधकामावरून विविध मिथके पसरविली. त्याच्या रकमेपासून त्याच्या आवश्यकतेपर्यंत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. काम थांबविण्यासाठी कोर्टापर्यंत धाव घेतली पण तिथेही ते उघडे पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करण्यासाठी पीएम केअर्स फंड, गुजरात मॉडेल, गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांचे फोटो यावरून वादळ उठविण्याचा प्रयत्न झाला. गुजरात, गंगा ही लोकेशन्स निवडण्यामागचे काँग्रेसच्या थिंकटँकचे गैरहेतू लगेच उघड झाले. कारण ही लोकेशन्स मोदींशी संबंधित आहेत आणि गंगा तर हिंदू आस्थेशी संबंधित आहे. तिला आंतरराष्ट्रीय मीडियातून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
या सगळ्या काँग्रेसच्या षडयंत्रावर विजया रहाटकर यांनी नेमक्या शब्दांमध्ये आपल्या फेसबुक पोस्टमध्ये अचूक बोट ठेवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App