नगरमध्ये क्लासवन अधिकारी हनीेट्रॅपमध्ये, शरीरसंबंधांचे व्हिडीओ काढून महिलेने मागितली तीन कोटी रुपयांची खंडणी

नगर जिल्ह्यातील एका क्लासवन अधिकाऱ्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या क्लासवन अधिकाऱ्याला हनीट्रॅपमध्ये फसविण्यासाठी महिलेने त्याला घरी बोलावून शरीरसंबंध ठेवले होते.  Class one officer from Nagar in honey trap, Woman demands Rs 3 crore ransom


प्रतिनिधी

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील एका क्लासवन अधिकाऱ्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या क्लासवन अधिकाऱ्याला हनीट्रॅपमध्ये फसविण्यासाठी महिलेने त्याला घरी बोलावून शरीरसंबंध ठेवले होते.

नगर तालुका पोलीस ठाण्यात या महिलेसह पाच आरोपींविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की या महिलेने नगर शहरातील एका क्लासवन अधिकाऱ्याला आपल्या जाळ्यात अडकविले होते. त्याला एकेदिवशी घरी बोलावले. शरीरसंबंध ठेवताना या महिलेच्या साथीदारांनी त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर या अधिकाऱ्याकडे तीन कोटी रुपये खंडणी मागितली. यातील ८० हजार रुपये या अधिकाऱ्याने दिले होते.या महिलेच्या विरोधात दुसर्‍या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या क्लासवन अधिकाऱ्याने पोलीसांशी संपर्क साधून आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला.
या महिलेचे साथीदार अमोल मोरे, सचिन खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नगर) यांच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लुबाडल्याची शंका आहे.

महिलेचा जाळ्यात अडकलेला क्लावसवन अधिकारी नगर तालुक्यातील जखणगाव शेजारच्या गावातील रहिवासी आहे.

Class one officer from Nagar in honey trap, Woman demands Rs 3 crore ransom