गुजरातेत भाजपने मुख्यमंत्र्यांसकट अख्खे मंत्रिमंडळ बिनबोभाट बदलले; पंजाबमध्ये काँग्रेस श्रेष्ठी बंडाळीच्या रस्त्यावर घसरले…!!


गुजरातमध्ये अवघ्या तीनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसकट अख्खे मंत्रिमंडळ बदलले. त्याचा बोभाटाही कुठे झाला नाही, पण पंजाब मध्ये मात्र जरा कुठे काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना हात लावायचा प्रयत्न केला तर सत्ताधारी काँग्रेस पक्षच बंडाळीचा रस्त्यावर घसरला आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्री पदाबरोबरच काँग्रेस पक्षाचा ही राजीनामा देणार आहेत त्यामुळे पंजाब काँग्रेस मध्ये उभी फूट पडणार आहे.Congress in Punjab on the verge of vertical split

नवज्योत सिंग सिद्धू यांची बाजू उचलून धरावी तर कॅप्टन अमरिंदरसिंग पक्षाबाहेर जाताहेत आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पारड्यात आपले वजन टाकावे तर नवज्योत सिंग सिद्धू आम आदमी पार्टीला डोळे मारत आहे अशा कात्रीत काँग्रेसची सापडले आहेत.



गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बिनबोभाट ऑपरेशन पार पाडत मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि त्यांचे अख्खे मंत्रिमंडळ बदलून टाकेल. नितीन पटेल यांच्या तथाकथित नाराजीच्या बातम्या माध्यमांनी चालवल्या. पण त्या प्रत्यक्षात खोट्या ठरल्या. नितीन पटेल यांची किंवा अन्य वरिष्ठ नेत्यांची बंडाळीची मात्रा मोदी आणि शहा यांच्या पुढे चालली नाही.

पण पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग मात्र थेट सोनिया गांधी आणि कमलनाथ यांना फोन करून अपमानित स्थितीत काँग्रेसमध्ये राहणार नाही, अशी धमकी देऊन राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. ते दुपारी चार वाजता राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते काँग्रेसचा ही राजीनामा देण्याची शक्यता असून त्यांच्याबरोबर अन्य काही समर्थक देखील काँग्रेसचा राजीनामा देतील.

पण एकूण गुजरात आणि पंजाब यांची तुलना केली तर गुजरात मधले राजकीय ऑपरेशन किती बिनबोभाट आणि यशस्वी झाले हे दिसून येते, तर पंजाबमध्ये काँग्रेस श्रेष्ठी करत असलेले ऑपरेशन कशा पद्धतीने फसत चालले आहे हे लक्षात येते आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नाराजीला काँग्रेस रस्त्यांना राजकीय दृष्ट्या मॅनेज करता आले नाही. त्याच बरोबर नवज्योत सिंग सिद्धू यांना देखील पुरते समाधानी ठेवता आलेले नाही. मधल्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मात्र उभी फूट पडली आहे. हे काँग्रेस श्रेष्ठींना दिल्लीत बसून बघावे लागले आहे.

Congress in Punjab on the verge of vertical split

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात