पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि माजी मंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. सिध्दू नवे ज्योतिरादित्य होऊन कॉँग्रेस फोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमरगढचे आमदार सुरजीत सिंग धीमान यांनी काँग्रेस आमदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून सामुहिक राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पक्षाचे नेतृत्व सिद्धू यांच्यासारख्या कोणीतरी व्यक्तीने करावे अशी मागणी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि माजी मंत्री नवज्योतसिंग सिध्दू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. सिध्दू नवे ज्योतिरादित्य होऊन कॉँग्रेस फोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमरगढचे आमदार सुरजीत सिंग धीमान यांनी काँग्रेस आमदारांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून सामुहिक राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पक्षाचे नेतृत्व सिद्धू यांच्यासारख्या कोणीतरी व्यक्तीने करावे अशी मागणी केली आहे.
धीमान म्हणाले, जर आम्ही राज्याच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसू तर खुर्च्यांना चिकटून राहण्यात काहीच फायदा नाही. काँग्रेस आमदारांनी आतील आवाज ओळखावा आणि सामुहिक राजीनामा द्यावा. मी आणि माझे सहकारी नाथू राम या मुद्द्यावर सहमत आहोत.
आम्ही राजीनामा देणार आहोत. आम्हाला फक्त दुसरा कोणीतरी नेतृत्व करावे असे वाटत आहे. ते नवज्योत सिंग सिद्धू देखील असू शकतात. चला काहीतरी करूया. आम्ही कोणतातरी नेता नेतृत्वासाठी उभा ठाकतो का, याची वाट पाहत होतो. उच्च न्यायालयाने जेव्हा एसआयटीचा अहवाल रद्द केला तेव्हाच मला राजीनामा द्यायचा होता. राज्यात ड्रग्ज आताही एक मोठा मुद्दा आहे, यामुळे सरकारविरोधात नाराजी जंगलातील आगीसारखी पसरू लागली आहे.
आता हे थांबणार नाही. या परिस्थितीत आम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही. नवज्योत सिंग सिद्धू आशेचा किरण आहेत. त्यांनी जर पक्षाचे नेतृत्व केले तर कदाचित पुन्हा सरकार येऊ शकेल, हे मी नाही तर राज्यातील लोकांचे मत आहे.
पंजाबमध्ये कॉँग्रेस सरकार मजबूत मानले जात होते. परंतु, मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि सिध्दू यांच्या वादात पक्षनेतृत्व कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाही. त्यामुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आमदारांमध्येही नाराजी वाढू लागली आहे. याचा परिणाम पक्षाच्या स्थैर्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App