वृत्तसंस्था
पुणे : महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.१५ सप्टेंबरपासून सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. Colleges will start from September 15, Today’s discussion on fee reduction: Samant
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सामंत बोलत होते. कोरोना संकटकाळात नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात कपात करून विद्यार्थ्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे इतर विद्यापीठांनीदेखील शुल्ककपातीचा निर्णय घ्यावा, यासाठी आज सोमवारी कुलगुरूंसोबत बैठक घेऊन शुल्ककपातीचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच दोन दिवसांत मंत्रालय स्तरावरून विद्यापीठांना पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी ग्वाहीही सामंत यांनी दिली.
प्राध्यापक भरतीचे आश्वासन
कोरोनामुळे प्राध्यापक भरती थांबली होती. ती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पहिला टप्पा म्हणून ३ हजार ७४ रिक्त जागेची भरती पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येईल. तसेच १२१ जागांवर ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठातील ६५९ जागांवर शिक्षकीय भरतीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सामंत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App