वृत्तसंस्था
मुंबई : गोव्यासह कोकणात आज आणि उद्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. Chance of sparse rains in Konkan; Forecast by the Meteorological Department
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र वाढल्याने पावसाची शक्यता आहे. रविवारी संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण होते. याचा प्रभाव कायम राहणार असून ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याचा आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण, गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली. विदर्भात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असले तरी ते किनारी भागापासून दूर जात आहे. याचा परिणाम म्हणून ८, ९ आणि १० नोव्हेंबर रोजी वादळी वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App