बोडोलँडमध्ये १७ वर्षांनी सत्तांतर; भाजपची चमकदार कामगिरी

  • युनायटेड पीपल्स पार्टी – भाजपची एकत्रित सत्ता

वृत्तसंस्था

गुवाहाटी : बोडोलँड परिषदेत १७ वर्षांनी सत्तांतर होते आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंटने परिषदेतले बहुमत दीर्घ काळानंतर गमावले असून बोडो युनायटेड पीपल्स पार्टी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतील अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. BTC election in Assam



बोडोलँड परिषदेच्या एकूण ४० जागांपैकी १७ जागा बोडोलँड पीपल्स फ्रंटला मिळाल्या असून विरोधी युनायटेड पीपल्स पार्टीला १२ आणि भाजपला ९ जागांवर यश मिळाले आहे. काँग्रेसला फक्त १ जागा मिळू शकली आहे. युनायटेड पीपल्स फ्रंट आणि भाजप एकत्र आल्यास साध्या बहुमताने ते बोडोलँडमध्ये सत्ता स्थापन करू शकतात. BTC election in Assam


वास्तविक बोडोलँड पीपल्स फ्रंट हा आसाममधील सत्ताधारी एनडीएचा घटक पक्ष आहे. सर्वानंद सोनोवाल सरकारमध्ये त्यांचे तीन मंत्री आहेत. तरीही बोडोलँड परिषदेत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढविणे पसंत केले. राज्याचे मंत्री हेमंत विश्वशर्मांनी निवडणूक मोहिमेचे नेतृत्व केले. त्यात त्यांना चमकदार कामगिरी करता आली आहे.

BTC election in Assam

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोडोलँड परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

एकूण जागा ४०

  • बोडोलँड पीपल्स फ्रंट १७
  • युनायटेड पीपल्स पार्टी १२
  •  भाजप ९
  • काँग्रेस १
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात