वृत्तसंस्था
मुंबई : लसीकरणा बाबत अजुनही अनेक प्रश्न आहेत जे वारंवार विचारले जातात. त्यात महत्वाचा आणि सर्वच ममतांना पडणारा प्रश्न म्हणजे स्तनपान करणार्या मातांनी लस घ्यावी की नाही? तसेच कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या व्यक्तीने कोरोनाची लस कधी घ्यावी असे प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलंय.
NEGVAC अर्थात (National Expert Group on Vaccine Administration for COVID-19)ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोनाची लस दिली जावी असं NEGVAC ने म्हटलं आहे .त्यामूळे आता स्तनपान करणार्या माताही लस घेऊ शकणार आहेत .
कोरोनामुक्त झाल्यानंतर आता ३ महिन्यांनी लस घेता येणार आहे : NEGVAC ने केलेल्या सूचनांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला ३ महिन्यांनी कोरोना लस द्यावी असं सांगण्यात आलं होतं. त्यांची ही सूचना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
तसंच कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
लसीकरणाबाबत NEGVAC च्या ४ महत्वाच्या सूचनांना मंजुरी :
कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला ३ महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर ३ महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा.
आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.
कोरोना लस घेण्यापूर्वी रॅपिड एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App