वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षात म्हणजे २०१९ ते २०२१ पर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या विजयाचा आलेख चढता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पासून प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि कार्यकर्त्यानी दिलेल्या योगदानामुळे भाजपचा प्रत्येक निवडणुकीत विजय झाला आहे. याबाबतच्या आकडेवारीवरून ही बाब अधिकच स्पष्ट होत आहे. BJP’s victory graph rose In Uttar Pradesh elections in two-year
विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या करकीर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. उत्तम संघटक अशी त्यांची ख्याती आहे. राज्यात भाजपच्या विजयाचा रथ कायमच अग्रेसर ठेवण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे.
उत्तरप्रदेशातील दोन वर्षातील विधानसभा पोटनिवडणूक, जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार बहुमताने आणि बहुसंख्येने निवडून आले आहेत. भाजपची ही गेल्या दोन वर्षातील कामगिरी नेत्रदीपक आहे.
भाजपची दोन वर्षातील कामगिरी
१) ऑक्टोबर २०१९ मधील विधानसभेच्या पहिल्या पोटनिवडणुकीत भाजपाला ११ पैकी ९ जागा २)नोव्हेंबर २०२० मधील विधानसभेच्या दुसऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाला ७ पैकी ६ जागा ३) नोव्हेंबर २०२० मधील शिक्षक/ पदवीधर विधान परिषद निवडणुकीत भाजपला ९ पैकी ६ जागा ४) जुलै २०२१ मधील जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत भाजपाचा ७५ पैकी ६७ जागांवर विजय ५ )जुलै २०२१ मधील ब्लॉक प्रमुख निवडणुकीत भाजपाला ७३५ पैकी ६४८ जागांवर विजय मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App