विशेष प्रतिनिधी
बंगळुरुः निवडणुका जिंकणे आणि पराभूत होणे हे एखाद्या राजकीय व्यक्तीच्या जीवनाचा भाग आहे. परंतु द्वैताच्या पलीकडे जाऊन लोकांच्या हितासाठी कार्य करणे, सर्व अडथळ्यांना ओलांडणे खरोखर महान उदात्त व्यक्तिचे वैशिष्ट्य आहे. नुकत्याच झालेल्या केरळ निवडणुकीत भाजपचा चेहरा ई.श्रीधरन हे त्याचे जाज्वल्य उदाहरण आहे.
प्रचारादरम्यान त्यांनी जे वचन दिले होते त्याप्रमाणे त्यांनी स्वत: च्या खिशातून पैसे खर्च करत अनेक कुटुंबांना वीज कनेक्शन मिळवून दिले आहे .वर्षानूवर्ष अंधारात राहणार्या दलितांच्या जीवनात प्रकाश आणनार्या या तेजाला सलाम!
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, श्रीधरन यांनी पलक्कडची जागा अल्पशा फरकाने गमावली मात्र निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान त्यांनी काही वचन दिले होते .त्याचीच पुर्तता आता मेट्रो मॅन करत आहेत . असेच एक वचन त्यांनी मदुरावीरन कॉलनीतील रहिवाशांना दिले होते त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणन्याचे आणि आता त्या वचनावर जाम राहत त्यांनी ते पुर्ण देखील केले आहे .
थकबाकी न मिळाल्यामुळे त्या परिसरातील काही कुटुंबांची वीज तोडण्यात आली होती तर काही दलित कुटुंबात विजच नव्हती श्रीधरन यांनी प्रलंबित थकबाकी भरुन काढण्यासाठी सहाय्यक अभियंता, केएसईबी, कल्पती यांना त्यांच्या वैयक्तिक बचतीतून ८१,५०० रुपयांचा धनादेश पाठवला आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी ११ कुटुंबांना नवीन वीज जोडणी देखील मिळावी यासाठी देखील खर्च उचलत तसे निर्देश दिले आहेत .
ई. श्रीधरन कोण आहेत?
ई. श्रीधरन (ई. श्रीधरन) यांना ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाते आणि कोलकाता मेट्रो ते दिल्ली मेट्रोच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाते. श्रीधरन यांना २००१ मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने विकासकामात केलेल्या योगदानाबद्दल गौरविण्यात आले. त्याशिवाय फ्रेंच सरकारने त्यांना २००५ साली ‘Chavalier de la Legion d’honneur’पुरस्कार प्रदान केला, तर टाईम मासिकाने ई. श्रीधरन यांना ‘एशियाचा हिरो’ ही पदवी दिली होती.
पांबन पुलाचे नूतनीकरणः
कोलकाता मेट्रो:
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना जोडणारी साधारणतः ८०० कि.मी. रेल्वे ही श्रीधरन यांची देण आहे. यात २००० हून अधिक पूल आणि ९० बोगदे आहेत. केवळ जमीन अधिग्रहणच नव्हे तर सैल माती, फ्लॅश पूर आणि भूस्खलनचे देखील आव्हान येथे असतांना यापैकी कोणतीही आपत्ती या माणसाला रोखू शकली नाही आणि त्यांनी हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला.
दिल्ली मेट्रो:
दिल्ली मेट्रोची विक्रमी वेळेत यशस्वी पूर्तता करण्याचे श्रेयही श्रीधरन यांनाच आहे. राजकीय दबावांपासून स्वत: ला दूर ठेवणे आणि निर्दोषपणे यश मिळवून देणे ही त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App