Freedom Fighter Sundarlal Bahuguna Death : येथील एम्समध्ये दाखल पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा (94 वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी 12 वाजता निधन झाले. सुंदरलाल बहुगुणा कोरोनाचा संसर्ग झाला होता. ऋषिकेशमधील एम्समध्ये दाखल झालेल्या 94 वर्षीय पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी कोविड न्यूमोनिया झाला होता. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. Freedom Fighter Sundarlal Bahuguna Death Due to Covid 19 in AIIMS Rushikesh Uttarakhand
विशेष प्रतिनिधी
ऋषिकेश : येथील एम्समध्ये दाखल पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा (94 वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी 12 वाजता निधन झाले. सुंदरलाल बहुगुणा कोरोनाचा संसर्ग झाला होता. ऋषिकेशमधील एम्समध्ये दाखल झालेल्या 94 वर्षीय पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी कोविड न्यूमोनिया झाला होता. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. डॉक्टरांचे पथक त्यांची ब्लड शुगर लेव्हल आणि ऑक्सिजन लेव्हल मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करत होते. तथापि, उपचारादरम्यान त्यांचे दु:खद निधन झाले.
सुंदरलाल बहुगणा हे पर्यावरणवादी असण्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिकही राहिलेल आहेत. पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1927 रोजी टिहरी जिल्ह्यातील भागीरथी नदीच्या काठी वसलेल्या मारोरा गावात झाला. त्याचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरीमध्ये वन अधिकारी होते.
वयाच्या 13 व्या वर्षी अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या जीवनाची दिशा बदलली. त्यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी लहानपणीच स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. त्यांनी टिहरी संस्थानाविरुद्धही आंदोलन केले होते.
हिमालयाचे संरक्षक सुंदरलाल बहुगुणा हे गाजलेल्या चिपको आंदोलनाचे प्रणेते होते. ते महात्मा गांधींचे अनुयायी होते. पर्यावरणाचे संरक्षण हेच त्यांनी जीवनाचे एकमेव ध्येय केले होते. सुंदरलाल यांनी वयाच्या 13 व्या वर्षी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1956 मध्ये लग्नानंतर त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी गावातच राहण्याचे ठरविले आणि डोंगरावर एक आश्रम उघडला. नंतर त्यांनी टिहरीच्या परिसरात दारूविरूद्ध मोर्चा उघडला. 1960 च्या दशकात त्यांनी आपले लक्ष वन आणि वृक्ष संरक्षणाकडे केंद्रित केले.
जगप्रसिद्ध चिपको आंदोलनातील महिला. (फोटो साभार- विकीपीडिया)
पर्यावरण संरक्षणासाठी 1970 मध्ये सुरू झालेली चळवळ संपूर्ण भारतभर सुरू झाली. चिपको आंदोलन त्यातील एक भाग होता. गढवाल हिमालयात वृक्ष तोडण्याविरोधात शांततेत आंदोलन सुरू होते. वृक्ष तोडण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराची माणसे आली तेव्हा 26 मार्च 1974 रोजी चामोली जिल्ह्यातील ग्रामीण महिला झाडाला चिकटून उभ्या राहिल्या. त्यानंतर हे आंदोलन देशभरात पसरले होते.
Freedom Fighter Sundarlal Bahuguna Death Due to Covid 19 in AIIMS Rushikesh Uttarakhand
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App