प्रतिनिधी
मुंबई – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर देखील गप्प बसणारे ठाकरे – पवार सरकारमधले ओबीसी मंत्री हे पवार काका – पुतण्याच्या ताटाखालचे मांजर आहेत, असे टीकास्त्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोडले आहे. BJP MLC gopichand padalkar targets OBC ministers in thackeray – pawar govt
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारला धारेवर धरून जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणूकांमध्ये ओबीसी आरक्षण आहे असे समजून भाजप ओबीसी उमेदवारच देईल, असे काल जाहीर केले. यानंतर गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
पडळकर म्हणाले की महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते हे पवार काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी मंत्र्यांचे माकड झाले आहे. या ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला सरकारमध्ये कवडीचीही किंमत राहिलेली नाही. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाहीत अशी भीमगर्जना ओबीसी मंत्र्यांनी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुका जाहीर झाल्या. यांच्या शब्दाला मातीमोल किंमत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
राज्यात भाजपा सर्व २०० जागांवर ओबीसी उमेदवार देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर सरकारची फाटली असल्याची टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App