मतदानाचा टक्का वाढल्याने महाविकास आघाडीला धास्ती, भाजपला आत्मविश्वास


राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने भारतीय जनता पक्षाला आत्मविश्वास आला आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीमध्ये मात्र धास्तीचे वातावरण आहे. bjp latest news


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने भारतीय जनता पक्षाला आत्मविश्वास आला आहे. दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीमध्ये मात्र धास्तीचे वातावरण आहे. bjp latest news

पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्या वेळी अवघे तीन टक्के मतदान झाले होते. यंदा ७० टक्के मतदान झाले. पुणे पदवीधर मतदारसंघामध्येही ५० टक्के मतदान झाले. गेल्या वेळी २२ टक्यांच्या आसपास मतदान झाले होते.

पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. मतदानाची ही टक्केवारी २००८ आणि २०१४ च्या निवडणुकीपेक्षा अधिक आहे. २००८ मध्ये ५२.५५ तर २०१४ मध्ये ३७ टक्के मतदान झाले होते.

मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी झाल्याने मतदान वाढले. याचा फायदा भाजपलाच होईल. मतदार यादीतून अनेक नावे गहाळ झाली, अन्यथा मतदान ७० टक्के झाले असते, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी व्यक्त केली. वाढीव मतदान सकारात्मक परिणाम करणारे ठरेल. आम्ही याकडे परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून बघतो. मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली होती. त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसून आले. ग्रामीण भागातही चांगले मतदान झाले, असे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनी सांगितले.

bjp latest news

अमरावती शिक्षक मतदारसंघात तर ८३ टक्यांच्या आसपास मतदान झाले. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत एवढा प्रतिसाद कधीच मिळत नाही. पुणे, औरंगाबादेतही हीच स्थिती राहिली. मतदारांनी रांगा लावून मतदान केल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले. यामुळे ही निवडणूक ग्रामपंचायतीची आहे की काय अशी शंका निर्माण झाली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात