वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलकांनी घोषणा तर भारत बंदच्या केल्या होत्या. त्याप्रमाणे काही शहरे, नगरे आणि गावांमध्ये बंद पाळण्यात आलाही. पण यात प्रामुख्याने बातम्या आल्या त्या बंदपेक्षा चक्का जाम, रास्ता रोको आणि रेल रोकोच्या. आंदोलनाचे हे जाहीर केल्यापेक्षा वेगळे स्वरूप देशभर पाहायला मिळाले. विशेषतः काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारची बंद सोडून आंदोलने झाली. bharat bandh on 8th december 2020
सर्वसाधारणपणे बंद जाहीर झाला की संबंधित पक्षाच्या प्रभावक्षेत्रात कडकडीत बंद पाहालया मिळायचा. पण काही अपवाद वगळता तसे पाहायला मिळाले नाही. उलट दिवसभर चक्का जाम, रास्ता रोको, रेल रोकोच्या बातम्या आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांच्या बातम्या सोशल मीडियातून आणि मेन स्ट्रीम मीडियातून पाहायला मिळाल्या. बंदचा फज्जा अशा बातम्या पाहायला मिळाल्या नाही तरी बंद १०० टक्के नव्हताच. तो शक्यही नव्हता असे एकूण मूळ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या आणि राजकीय नेत्यांच्या आविर्भावावरून स्पष्ट होते. bharat bandh on 8th december 2020
महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रात ग्रामीण भागात बंद पाळला गेला. पण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये अपवाद वगळता शहरे उघडी होती. वाहतूक सुरू होती. बंदचा एकूण परिणाम या शहरांमध्ये जाणवला नाही. विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी सामील होऊनही बंद परिणामकारक ठरलेला दिसला नाही. १०० टक्के तर नाहीच नाही.
बंगाल, ओडिशामध्ये डाव्या पक्षांनी रेल्वे अडवल्या
कोलकातामधील जादवपूर रेल्वे स्टेशनवर डाव्या पक्षांच्या कामगारांनी गाड्या अडवल्या आणि ते रुळावर बसले. भुवनेश्वर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी गाड्या अडवल्या. केरळमध्येही मोदी सरकारचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्याचे प्रकार घडले.
भारत बंदच्या बातम्यांमधून शायनिंग नेत्यांची; फरफट शेतकऱ्यांची
शेतकरी म्हणाले- सर्वसामान्यांना त्रास होऊ देणार नाही भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की आम्ही शांततेत निदर्शने करू. जे लोक बंदमध्ये अडकले आहेत त्यांना आम्ही 2-3 तास पाणी आणि फळे देऊ.
गुजरातमध्ये 3 हायवेवर आंदोलन
अहमदाबाद-विरमगाम हायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केले. यामुळे ट्रॅफिक जाम झाला. आंदोलकांनी वडोदरा आणि भरुचमध्ये नॅशनल हायवे जाम केला. पोलिसांनी अहमदाबादमध्ये काही लोकांना अटक केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App