पवारांसारखेच भूपिंदर सिंह हुड्डा यांनी देखील शेतकऱ्यांसाठी खुल्या बाजाराचे समर्थन केले होते


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज शेतकरी आंदोलनात शिरकाव करून काँग्रेसने भारत बंदसाठी मोठा आवाज काढला असला तरी जे कृषी विषयक सुधारणा कायदे केंद्रातील भाजपच्या सरकारने केले आहेत, त्याचा पुकारा हरियाणाचे काँगेसी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनी २०१० मध्येच केला होता. पत्रकार मारया शकील यांनी त्यावेळचा रिपोर्ट आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. bhupinder hudda exposed by marya shakil

घोषणा भारत बंदच्या; बातम्या चक्का जाम, रेल रोकोच्या

आज ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पाठोपाठ भूपिंदरसिंग हुड्डा शेतकरी आंदोलनात वेगळी भूमिका घेऊन उभे राहात असले तरी दोघांच्या २०१० मधील भूमिका एक्सपोज झाल्या आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर सरकारचे आणि राजकीय पक्षांचे नियंत्रण असल्याने खासगी गुंतवणूकदार शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्यात कचरतात. शेती उत्पादन, साठवण आणि वितरणात
खासगी गुंतवणूक येण्याची मोठी गरज असताना हे केवळ सरकारी आणि राजकीय नियंत्रणामुळे घडत नाही. याकडे हुड्डा यांनी त्यावेळी लक्ष वेधले होते.

bhupinder hudda exposed by marya shakil

कृषी क्षेत्र सर्व प्रकारची खासगी गुंतवणूक वाढविण्यासाठी नियंत्रणमुक्त करावे, असा पुकारा हुड्डा यांनी त्यावेळी केला होता. २००३ च्या कृषी पणन कायद्याची अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, अशी आग्रही भूमिका हुड्डा यांनी मांडली होती. आज मात्र, त्यांचा काँग्रेस पक्ष शेतकरी आंदोलनात शिरकाव करून कृषी कायद्यांना विरोध करत आहे. या पार्श्वभूमीवर पवार आणि हुड्डा या दोन नेत्यांच्या दुटप्पी भूमिका समोर आल्या आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात