हम जितेंगे – Positivity Unlimited : धैर्याने वागा, विज्ञानाची साथ घ्या आणि संकट हीच संधी माना; श्री श्री रविशंकर, आजीम प्रेमजी आणि निवेदिता भिडे यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सकारात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘हम जितेंगे – Positivity Unlimited ‘ या ऑनलाइन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, उद्योगपती, विप्रो समूहाचे अध्यक्ष आजीम प्रेमजी आणि कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी गुंफले. Be courageous, science is the path to solve problem and Think Problem is The Opportunity : Sri sri Ravi shankar, Azim Premji , Nivedita Bhide told

दिल्ली येथील कोव्हिड रिस्पोन्स टीमच्या पुढाकाराने ही व्याख्यानमाला अक्षय तृतीये निमित्त 11 ते 15 मे पर्यंत सुरु राहणार आहे.

श्री श्री रविशंकर म्हणाले…

1) कोरोनाच्या संकटात व्यक्ती हतबल होतो. मृत्यूचे तांडव पाहून असे होणे सहाजिकच आहे. पण, त्याचा धैर्याने सामना करायला हवा. धैर्य, शौर्य, जोश जागृत करून उदासीनतेला पळवून लावा.

2) जबाबदारीचे भान राखून भावूकता वाढीस लागली पाहिजे. स्वतःच्या दुःखा पेक्षा दुसऱ्याचे दुःख मोठे असे समजले पाहिजे. त्यासाठी दुसऱ्यांना मदत करावी.

3) अशा कठीण प्रसंगात करुणा जागृत करून सेवा कार्य करण्याची संधी तुम्हाला मिळाली , असे समजून वागा. करुणेतून जागा झालेल्या सेवा भावातून तुमचे संकटाला तोंड देण्याचे मनोबल वाढणार आहे.

4) जेव्हा एखादा मनुष्य दुःखात लोटला जातो तेव्हा तो देहभान हरपतो. अशा वेळी त्यातून सावरण्यासाठी प्राणायाम, मंत्रोच्चार, योगासने करण्याची गरज आहे. त्याद्वारे आत्मबल वाढेल.

5) एखादा विद्यार्थी परिक्षा द्यायला जातो. तेव्हा त्याला देव आठवतो. आता परीक्षेचा काळ असल्याचे समजून स्वतःमध्ये ईश्वर जागवा. ‘निर्बल के बलराम’ हे लक्षात ठेवा. त्याद्वारे मानसिक तणावापासून दूर रहाल.

6) योगासने तुम्हाला दुःखापासून दूर ठेवतील. योग, प्राणायाम आणि योग्य आहार उत्तम आरोग्यास उपयुक्त आहेत. हळद, ताक, ज्येष्ठमध सेवन करावे.

7) नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. नकारात्मक बोलून समस्या काही सुटणार नाहीत. या उलट सकारात्मक गोष्टी जीवनात चैतन्य फुलवतील.

 

आजीम प्रेमजी म्हणाले…

1) या आजाराचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि सत्य काय आहे, हे ओळखून वाटचाल केली पाहिजे. वेगाने पावले उचलण्यासाठी विज्ञानाची मदत घेतली पाहिजे.

2) सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. एकत्र राहिला तर विजय आपला आणि विभक्त राहिला तर पराभव तुमचा आहे, हे तत्व समोर ठेवून कोरोनाचा सामना केला पाहिजे.

3) संक्रमणाचा मोठा फटका गावपातळीवर आणि गरिबांना बसला आहे. त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नवी समाजरचना करण्याबरोबर जनतेची अर्थव्यवस्था सूदृढ करण्यावर लक्ष केंद्रित करावे.



निवेदिता भिडे म्हणाल्या …

1) कोरोना हे संकट नसून ती एक संधी आहे, असे समजून तुम्ही वागा. त्यामुळे तुमच्या प्रगतीचे रस्ते खुले होतील.

2) प्राणशक्ती वाढविण्यावर भर द्या. यासाठी श्वास बाहेर जास्त सोडा. त्यामुळे तुम्ही जास्त श्वास अधिक शरीरात घ्याल. आपोआप तुमची प्राणशक्ती वाढेल.

3) दिवसातून 5 ते 10 मिनिटे ओंकार याचा उच्चार करा. त्याने कोरोनाशी मुकाबला करण्याची शक्ती वाढेल. ओंकार हे स्पंदन आहे. त्याचा संध्या समई उच्चार केला तर सकारात्मकता वाढेल.

4) मनाची शक्ती मोठी आहे. तुम्ही जसा विचार कराल तसे बनाल. चांगला विचार केल्यास सुख येईल. दररोज जगातील सर्वाना आरोग्य मिळावे , अशी प्रार्थना करा.

5) लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरी आहात. अशी संधी तुम्हाला कुटुंबासह एकत्र राहण्यासाठी प्रथम मिळत आहे. त्याचा लाभ घेऊन नवे शिकण्याचा प्रयत्न करा. एखादी नवी भाषा शिका. संस्कृतही तुम्ही शिकू शकाल आणि नव्या भाषेत कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा. सूर्यनमस्कार, एकत्र जेवण बनविणे, मुलांशी संवाद आदी गोष्टी करता येतील.

6) या काळात दुसऱ्याला मदत करण्याची अपूर्व संधी तुम्हाला मिळाली. अगदी कॉलनीत कोरोना झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना तुम्ही मदत करू शकता. त्यांना जेवण पुरवून सेवा करू शकाल.

7) प्रार्थनेत मोठी शक्ती आहे. त्यातून सकारात्मकता वाढेल. विविध स्रोत म्हणा, जसे उदा. रामरक्षा.

8) निस्वार्थी भावनेने केलेले कार्य हे उन्नतीचा मार्ग आहे, हे लक्षात ठेवा.

9) मृत्यूचे भय बाळगू नका. मृत्यू सर्वाना आहे. भौतिकवादामुळे आपण देहबुद्धीत वावरत आहोत. शरीर नाशवंत असून आत्मा अमर आहे, हे आपली भारतीय संस्कृती सांगते. त्यामुळे मनातून मृत्यूचे भय काढून टाका. जगजेता अलेक्झांडर सुद्धा भारत जिंकू शकला नव्हता. कारण भारतभूमीवर मृत्यूचे भय नव्हते.
10) पाप नाहीसे व्हावे, यासाठी मनुष्य तिर्थक्षेत्राच्या यात्रेला जातो. पण, आता मनुष्याला सेवा करून पुण्य पदरात पाडून घेण्याची अपूर्व संधी मिळाली आहे. पण, या संकटाचा गैरफायदा उठवून स्वतः चा स्वार्थ साधणारा पापाचा भागीदार निश्चित होणार आहे.

Be courageous, science is the path to solve problem and Think Problem is The Opportunity : Sri sri Ravi shankar, Azim Premji , Nivedita Bhide told

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात