बहुधर्मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधानांकडून अभिनंदन; मोदींच्या विकासवादी मार्गाने चालण्याची हेमंत विश्वशर्मांची ग्वाही

वृत्तसंस्था

गुवाहाटी – आसामसारख्या बहुलतावादी अर्थात बहुधर्मी राज्याचे (pluralistic state) नेतृत्व करायला मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी खास अभिनंदन केले आहे. Bangladesh PM Sheikh Hasina invited Assam to reap benefits from Bangladesh’s growth trajectory, congrasulates himanta viswa sarma

बांगलादेशाने आर्थिक क्षेत्रात जी झेप घेतली आहे, तिच्यात सहभागीदारी करण्यासाठी मी आसामला निमंत्रित करते. आसामसारख्या बहुधर्मी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांचे मी अभिनंदन करते, असा संदेश देणारे ट्विट पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे. हे ट्विट बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रिट्विट केले आहे. यात आसामचा उल्लेख आवर्जून बहुधर्मी राज्य (pluralistic state) असा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी शेख हसीना यांच्या ट्विटला ताबडतोब उत्तर देऊन त्यांचे आभार मानले आहेत. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासवादी मार्गाने आसाम वाटचाल करेल, अशी ग्वाही दिली आहे. भारत आणि बांगलादेश एकत्रितरित्या पुढची विकासाची वाटचाल करतील, त्याचा दोन्ही देशांना लाभ मिळेल, असे हेमंत विश्वशर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

शेख हसीनांच्या संदेशाचे राजकीय महत्त्व

कोणत्याही देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाच्या निवडीनंतर सदिच्छा संदेश पाठवत असतात. हा सामान्य प्रोटोकॉल आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना अभिनंदन संदेश पाठविणे याला वेगळा अँगल आहे, तो हेमंत विश्वशर्मा यांच्या प्रतिमेशी संबंधित आहे.

  • हेमंत विश्वशर्मा यांनी आसाममध्ये बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांसंबंधी कठोर भूमिका घेतली आहे.
  • त्यांनी मदरशांचे सरकारी अनुदान निवडणूकीपूर्वीच बंद करून टाकले आहे.
  • आसाममध्ये सीएए बरोबरच एनआरसी कायदे लागू करण्यावर त्यांचा भर आहे.

हेच मुद्दे बांगलादेशाला खटकणारे आहेत. त्यामुळे बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी आपल्या संदेशात बहुधर्मी आसाम (pluralistic state) असा आवर्जून उल्लेख केला आहे. पण त्यातला नेमका राजकीय अर्थ ओळखून हेमंत विश्वशर्मा यांनी देखील त्यांना मोदींच्या विकासवादी राजकारणाची आठवण करून दिली आहे, की ज्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सीएए कायदा लागू केला आहे.

Bangladesh PM Sheikh Hasina invited Assam to reap benefits from Bangladesh’s growth trajectory, congrasulates himanta viswa sarma

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात