महाराष्ट्राच्या सत्ता बदलात देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नेमके काय साध्य केले आहे??, याविषयी बराच राजकीय खल राजकीय वर्तुळांबरोबरच सोशल मीडियावर सुरू आहे. पण भाजपमध्ये काय किंवा काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षात काय अशा घटना नवीन नाहीत.Balance of power : devendra Fadanavis can act in shinde government as rajnath singh acts in modi government
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जसे राजनाथ सिंह यांचे स्थान उंचावलेले आहे, तसेच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्थान असेल असे सध्या दिसत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचार प्रमुखपदी आणि नंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून या दोन्ही घोषणा त्यावेळचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवली नाराज झाले होते. अर्थात लालकृष्ण अडवाणी हे राजनाथ सिंह आणि मोदी यांच्यापेक्षा आधीच्या पिढीतले आणि दोघांचेही वरिष्ठ नेते होते. पण राजनाथ सिंह यांचे तसे नव्हते. पण ते मोदी मंत्रिमंडळात सामावले गेले. सुरुवातीला पाच वर्षे गृहमंत्री आणि आता संरक्षण मंत्री पदावर राजनाथ सिंह हे आपला राजकीय आब राखून काम करताना दिसत आहेत.
मोदींचे बॅलन्स ऑफ पॉवर
केंद्रीय मंत्रिमंडळातली सर्व वरिष्ठ मंत्र्यांची राजकीय पोझिशन आपापल्या ठिकाणी अधिकारयुक्त आणि “बॅलन्स ऑफ पॉवरचे” उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे वर्चस्व मंत्रिमंडळावर असणे स्वाभाविक आहे. पण गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा कामावरचा ठसा उत्तम आहे. संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह उत्तम काम करत आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचाही बोलबाला आहे.
प्रभावी काम बोलेल
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या अनुभवाच्या आणि प्रशासकीय कौशल्याच्या बळावर राजनाथ सिंह यांच्यासारखीच प्रभावी भूमिका बजावू शकतात. ज्यांचे नाव आपण पंतप्रधान पदासाठी सूचित केले त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणे सुरुवातीला राजनाथ सिंह यांना देखील ऑकवर्ड झाले. पण नंतर ते रुळले. किंबहुना राजकीय दृष्ट्या रेलेव्हंट राहिले. आपल्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा आणि अधिकार क्षेत्राचा पूर्ण वापर करत राहिले. त्यामुळे राजनाथ सिंह यांचा मोदींच्या मंत्रिमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री हे स्थान गेली आठ वर्षे अबाधित आहे. त्याला कुठेही धक्का लागलेला नाही.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत नेमके असे होऊ शकते. आपल्याला मिळालेले उपमुख्यमंत्री पद आणि महत्त्वाची खाती यांचा उत्तम कारभार ते करू शकतात आणि आपला ठसा मुख्यमंत्री पदापेक्षा कुठेही कमी नाही हे ते दाखवून देऊ शकतात.
रुतबा आणि अधिकार कायम
विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते कमी आणि कार्यकारी मुख्यमंत्री जास्त वाटले होते. आता तर ते थेट उपमुख्यमंत्री आहेत. महत्त्वाची खाती त्यांच्याकडे येणार आहेत. शिंदे मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा राहणार आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस फक्त एक पायरी खाली उतरले आहेत. बाकी त्यांचा रुतबा आणि अधिकार कायमच दिसत आहेत.
जुन्या योजनांचे पुनरुज्जीवन
त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू झालेल्या सर्व महत्त्वाकांक्षी योजना आणि प्रकल्पांना गती देण्याचे काम ते करू शकतात. किंबहुना त्यांनी त्याची सुरुवातही केली आहे. त्यामुळेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो आरे कारशेड ते जलयुक्त शिवार सर्व योजनांना गती देण्याचे काम त्यांनी कालच सुरू केले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न येत्या वर्षभरात मिळण्याची शक्यता आहे. याचे सगळे क्रेडिट फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांच्याही कौशल्याला मिळेल हे आजचे वास्तव राजकीय चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App