प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढले नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार, असे म्हटल्याबरोबर मुंब्य्रातील मौलवींनी शांततेचे आवाहन करून सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे दावे केले होते. मात्र, हे दावे मनसेने फोल ठरवले आहेत. रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत भोंगे लावण्यावर बंदी असतानाही मुंब्रामध्ये भल्या पहाटे सुरू असलेल्या अजानचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करून मनसेने मुंब्रा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. Azaan from the mosque bells at 4.56 am in mumbra
ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांकडे सर्वोच्च न्यायालयाची अवहेलना केल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, सुप्रीम कोर्ट नियमानुसार रात्री 10.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत भोंग्यांवर बंदी असताना, शनिवारी मुंब्रा भागात पहाटे 4.56 वाजता मोठ्या आवाजात अजान पठण सुरू असल्याचे व्हिडीओ काही जणांनी मनसेकडे पाठवले आहेत. तेव्हा हा प्रकार न्यायालयाच्या निर्णयाची अवहेलना असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. तसेच सोशल मिडीयातही हे व्हिडीओ व्हायरल करून पोलिसांना कारवाईचे आवाहन केले आहे.
– हा उफराटा न्याय का ?
कोणत्याही अटी शर्तींचे पालन न करता मुंब्रा भागात भोंगे लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंब्रात काही मौलवींनी पत्रकार परिषद घेऊन, शांततेचे आवाहन करीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जाईल. असे सांगितले होते. मात्र तसे चित्र दिसत नसून एकाला एक न्याय आणि या मंडळीना दुसरा न्याय का??, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App