विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : असामचे मुख्यमंत्री आपल्या वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण विचार आणि निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात.आता वृद्धांची काळजी आणि त्यांच्यावरील प्रेमाला चालना देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी 6 आणि 7 जानेवारी 2022 रोजी आसाम सरकारी कर्मचार्यांसाठी विशेष रजा मंजूर केली आहे.Assam CM Himanta Biswa Sarma announces special leaves to govt employees to spend time with parents: Details
मुख्यमंत्र्यांनी रविवारी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत अधिकाऱ्यांना ह्या सुट्ट्या आपल्या आई वडिलांसह खर्च करण्याचे आवाहन केले आहे.
सुट्ट्यांमध्ये कुटुंब,आई-वडील आणि सासरच्या लोकांसोबत वेळ घालवा.
To uphold ancient Indian values, I urge Assam Govt employees to spend quality time with their parents/in-laws on Jan 6 & 7, 2022 designated as spl leave. I request them to rededicate themselves to the cause of building a New Assam & New India with blessings of their parents. pic.twitter.com/hZ2iwbgKoB — Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) January 2, 2022
To uphold ancient Indian values, I urge Assam Govt employees to spend quality time with their parents/in-laws on Jan 6 & 7, 2022 designated as spl leave.
I request them to rededicate themselves to the cause of building a New Assam & New India with blessings of their parents. pic.twitter.com/hZ2iwbgKoB
— Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) January 2, 2022
“आसाम सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 6 आणि 7 जानेवारी 2022 रोजी प्रासंगिक रजेचा लाभ घेण्यास अनुमती देत आहे, 8 आणि 9 जानेवारी 2022 या दोन सुट्ट्यांसह शनिवार आणि रविवार आहे. जेणेकरुन त्यांना उपरोक्त दिवस त्यांचे आईवडील आणि सासु सासरे यांच्यासोबत घालवता येतील.”
रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आठवण करून दिली की पुरावा म्हणून त्यांना सुट्ट्यांमध्ये पालकांसोबत राहिल्याचे फोटो काढणे बंधनकारक असेल.
ज्यांना सुटी हवी आहे त्यांनी अगोदर रजेसाठी अर्ज करावा. ऑनफिल्ड-ड्यूटी पोलिस, आरोग्य सेवा अधिकारी आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित इतर अधिकारी हे पुढील चार महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुट्ट्या देखील घेऊ शकतील.
मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की त्यांचे सरकार पुढील वर्षी धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुट्ट्या मंजूर करण्याचा विचार करत आहे.
हे पाऊल कौटुंबिक संस्कृती प्राचीन भारतीय मूल्ये जपण्याच्या दृष्टीकोनातून उचलले आहे असे हिमंता बिस्वा सरमा यांनी लिहिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App