वृत्तसंस्था
सिंधदुर्ग : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चक्क मुख्यमंत्री म्हणून थेट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं नाव घेतले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विनायक राऊत यांच्या या विधानानंतर खळबळ उडाली आहे. Ashok Chavan is the Chief Minister of the State Vinayak Raut told
विनायक राऊत हे शनिवारी (२ सप्टेंबर) सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणीसाठी आले होते. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी चक्क महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला आहे
बोलण्याच्या ओघात अनेक नेते चुकीचे शब्दप्रयोग, चुकीची वाक्य, आक्षेपार्ह उल्लेख आणि विधाने करत असतात. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना विनायक राऊत यांच्यासारख्या बड्या नेत्याला याचा विसर पडल्याचे दिसते. त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली जात आहे.
– राज्याचे मुख्यमंत्री म्हणे अशोक चव्हाण
– विनायक राऊत यांच्या या विधानानंतर खळबळ
– आंजिवडे घाट पाहणी करताना ठाकरे यांना विसरले
– राऊत यांच्याविधानाची खिल्ली उडवली जात आहे
– सोशल मिडियावर व्हिडिओ झाला व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App