अविचारी राजा, विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा, आशिष शेलार यांची उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका


मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!!’ असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक!’ असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.

Ashish Shelar criticism Uddhav and Aditya Thackeray

कांजूरमार्ग येथे होत असलेल्या मुंबई मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर शिवसेनेवर भाजपकडून टीका केली जात आहे. मुंबई हायकोर्टाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे.

Ashish Shelar criticism Uddhav and Aditya Thackeray

यावरुन भाजप सातत्याने सरकारवर टीका करत आहे. भाजप नेते आशिष शेलारांनीही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शेलार म्हणाले, मेट्रोला गिरगावात विरोध केला, मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर..प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच! आता मेट्रो कारशेड उभारण्या पेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण