नाशिक : तुरुंगातच खुर्चीला चिकटून राहण्याचा अरविंद केजरीवालांचा हट्ट, पण पत्नीला पुढे आणण्यासाठी इतरांचेही कापायचेत पंख!!, ही खरी दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांची स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजीतूनच केजरीवालांनी आपल्या 55 समर्थक आमदारांना आज आपल्या पत्नीच्या म्हणजे सुनीता केजरीवालांच्या भेटीला पाठविले. या एका खेळीतून अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात बसूनच आम आदमी पार्टीतल्या मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या नेत्यांचे पंख कापून टाकले.Arvind kejriwal clipping the wings of ambitious leaders of AAP from prison
दिल्लीच्या दारू घोटाळ्यात, शिक्षण घोटाळ्यात आम आदमी पार्टीचे महत्त्वाचे मंत्री तुरुंगातच आहेत. स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन हे मंत्री तुरुंगात आहेत. त्यांच्या पाठोपाठ आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज हे मंत्री देखील तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यापाठोपाठ लंडनवारी करणारे खासदार राघव चढ्ढा यांचाही नंबर लागण्याची शक्यता आहे.
पण तरी देखील आम आदमी पार्टीच्या उरलेल्या आमदारांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे. हे केजरीवाल पक्के ओळखून आहेत आणि त्यांना रोखण्यासाठीच केजरीवालांनी आत्तापर्यंत तुरुंगातूनच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला चिकटून राहण्याचा हट्ट चालवला आहे. तुरुंगात राहून आपण मुख्यमंत्री कार्यालय चालवू शकत नाही. दिल्लीचा कारभार हाकू शकत नाही, हे केजरीवालांना समजत नाही, असे बिलकुल नाही. उलट त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकारी राहिलेल्या नेत्याला हे निश्चित माहिती आहे. त्या मागची नैतिकता – अनैतिकता याचे धडे जरी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश अजय रस्तोगी यांनी केजरीवालांना दिले असले, तरीदेखील केजरीवाल मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला तयार नाहीत. याचा खरा अर्थ हाच आहे की एक तर मुख्यमंत्री कार्यालयातील “सिक्रेट्स” इतर कोणाला कळू नयेत आणि आपल्याला मुख्यमंत्रीपदावर पायउतार व्हावे लागलेच, तर आपल्या जागी सुनीता केजरीवाल यांना बसवून आम आदमी पार्टीची त्यांच्यामागे फरफट करण्याची केजरीवालांची स्ट्रॅटेजी आहे. त्यासाठीच बाहेर चाललेली टीका सहन करून ते तुरुंगातूनच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत.
केजरीवालांची अटक ही केवळ मनी लॉन्ड्रीग पुरती किंवा दारू धोरणापुरती मर्यादित असण्याची शक्यता फार कमी आहे. ही प्रकरणे बाहेर येऊन ती ईडीच्या स्कॅनर खाली आली आणि त्यातून बऱ्याच गोष्टी “बाहेर” आल्या, पण त्या पलीकडे जाऊन केजरीवालांची बरीच “सिक्रेट्स” ही गुप्तहेरगिरीशी संबंधित असल्याचा दाट संशय आहे आणि त्यात थेट अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयए हिचा संबंध असल्याचा संशय आहे. बाकी कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या अटकेनंतर नव्हे, पण केजरीवालांच्या अटकेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर जो आरडाओरडा झाला, लोकशाहीच्या नावाने ढोल वाजवला गेला, त्याचे खरे इंगित गुप्तहेरगिरीशी संबंधित असल्याचे बोलले जाते. म्हणूनच केजरीवाल आपल्याजवळ असलेली “सिक्रेट्स” वाचवण्यासाठी तुरुंगात राहूनही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला चिकटून असल्याचेही दिसून येते.
आता ईडी, सीबीआय किंवा बाकीच्या तपास संस्था तपासाचा वेग कसा आणि किती वाढवतात??, तपास किती “खोलवर” नेतात??, यावर केजरीवालांचे भवितव्य अवलंबून आहे आणि त्यानंतरच केजरीवाल राजीनामा देतील की खुर्चीला चिकटून राहतील आणि राजीनामा द्यावा लागलाच, तर ते आपल्या पत्नीलाच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवू शकतील का?? या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more