श्री केदारनाथचे स्थापत्यशास्त्र : कधीही न उलगडलेले कोडे !


भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अत्यंत दर्जेदार नमुना म्हणजे केदारनाथ… हजारो वर्षांपूर्वी देखील भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे ज्ञान – विज्ञान किती प्रचंड विस्तारले होते, याचा ज्वलंत नमुना म्हणजे केदारनाथ… ऐतिहासिक संशोधने तपासली तर लक्षात येते की, हे मंदिर कमीत कमी १,२०० पेक्षा अधिक वर्षांपासून अस्तित्वात आहे.. architecture of Sri Kedarnath: An Unsolved Puzzle!

एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड.. या ३ पर्वतातून वाहणाऱ्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी या ५ नद्या परिसरात आहेत. येथे हिवाळ्यात प्रचंड थंडी तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारे पाणी असते. अशा प्रतिकूल वातावरणात देखील हे मंदिर अजूनही सक्षमपणे उभे आहे..

१००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहिलं असेल? हा विचार आपण एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या Ice Age कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला आहे.

साधारण १३०० ते १७०० या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडले गेले असावे. त्याची शहानिशा करण्यासाठी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जीओलोजी, डेहराडूनने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर लिग्नोम्याटीक डेटिंग ही टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट हे दगडांचे आयुष्य ओळखण्यासाठी केली जाते. या टेस्टमध्ये असे स्पष्ट दिसून आले की साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडले गेलेले होते. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.

अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मते या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडीट मध्ये १०० पैकी ९९% मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. IIT मद्रास यांनी मंदिरावर NDT टेस्टिंग करुन बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झाले आणि त्याची सद्यस्थिती काय याचा अभ्यास केला. मात्र त्यांनी सुद्धा मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे.

२ वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर केवळ पासच नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात? तब्बल १२०० वर्षानंतर जिथे त्या भागातले सगळे वाहून जाते, एकही वास्तू उभी राहत नाही. त्या ठिकाणी हे मंदिर दिमाखात उभे आहे आणि नुसते उभे नाही तर अगदी मजबूत आहे.

ज्या पद्धतीने हे मंदिर बांधले गेले आहे, ज्या जागेची निवड केली गेली आहे, ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे ते विलक्षण आहे. कदाचित त्यामुळेच हे मंदिर प्रलयातही अगदी दिमाखात उभे राहू शकले असे आजचे विज्ञान सांगत आहे.

हे मंदिर उभारताना उत्तर-दक्षिण असं बांधले गेले आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिरे ही पूर्व-पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधले गेले आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर पूर्व-पश्चिम असे असते, तर ते आधीच नष्ट झाले असते. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झाले असते. पण या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचले आहे.

त्याचप्रमाणे मंदिराच्या बांधकामासाठी जो दगड वापरला गेला आहे, तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. विशेष म्हणजे हा दगड तिकडे उपलब्ध होत नाही. मग कल्पना करा की ते दगड तिथपर्यंत वाहून कसे आणले असतील?

२०१३ मध्ये केदारनाथ येथे आलेला प्रलय सर्व जगाच्या परिचयाचा आहे. सरासरी पेक्षा तब्बल ३७५% अधिक झालेल्या या पावसामुळे जवळपास ५,७४८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. १,१०,००० पेक्षा अधिक नागरिकांना वायूसेनेने वाचवले होते. इतक्या बिकट वातावरणात देखील या बांधकामाला लहानसाही धक्का लागला नाही..

हे बांधकाम सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तापमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे.

त्या काळात आजच्याप्रमाणे कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसताना हे दगड तिथपर्यंत नेऊन हे बांधकाम कसे केले असेल हे कधीही न उलगडलेले कोडे आहे. त्याचप्रमाणे मंदिराची संरचना इतकी भरभक्कम आणि अभेद्य कशी असेल? त्यासाठी कोणत्या प्रतीचे विज्ञान वापरले गेलेले असेल? हे खरोखर बुद्धीला चकित करणारे आहे… आणि म्हणूनच अखेर श्रद्धेने केदारनाथसमोर मान नमवावी वाटते..

एक अभियंता म्हणून मला आपल्या पूर्वजांचा अतिशय अभिमान वाटतो. कोणत्याही सुविधा नसताना त्यांनी जे काम केले ते आजच्या इंजीनियरिंग युगाला प्रचंड प्रेरणादायी आहे..

– अतुल चव्हाण

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे.

(सौजन्य : फेसबुक)

architecture of Sri Kedarnath: An Unsolved Puzzle!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात