निवडणूक आयुक्तपदी अनुप चंद्र पांडे यांची नियुक्ती; केंद्र सरकारची घोषणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबतची घोषणा केली. Anup chandra pande Is New Election Commissioner

उत्तरप्रदेशच्या 1984 च्या केडरचे ते अधिकारी होते. निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची जागा ते घेणार आहेत. अरोरा हे 12 एप्रिलला निवृत्त झाले होते. पांडे यांच्या नियुक्तीमुळे आयोगाच्या तीन सदस्यांच्या जागा पूर्ण भरल्या असून आयोगाचे काम वेगाने होण्यास चालना मिळणार आहे. पांडे यांच्यासोबत सुशील चंद्र आणि राजीव कुमार हे सहकारी आहेत.

पुढील वर्षी उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. तेव्हा आयोगाला मोठी तयारी करावी लागणार आहे.

Anup chandra pande Is New Election Commissioner

महत्त्वाच्या बातम्या