वृत्तसंस्था
बोलपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर ज्या प्रकारे तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी हल्ला केला त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण मी तृणमूळच्या नेत्यांना सांगू इच्छितो, असे हल्ले करून भाजपला रोखता येणार नाही. आम्ही पश्चिम बंगालमध्ये आमचा पाया मजबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिला. amit shah dares mamat banerjee
बोलपूरमध्ये अमित शहांनी रोड शो केला. हा या शहराच्या इतिहासातला सर्वात मोठा रोड शो ठरला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. बोलपूरच्या रोड शोची अमित शहांनी तशी प्रशंसा केली. मी निवडणुकांमध्ये एवढे रोड शो केले पण असा आणि एवढा प्रचंड प्रतिसाद असलेला रोड शो मी पाहिला नाही, असे अमित शहा म्हणाले. amit shah dares mamat banerjee
३ – ४ किलोमीटरच्या संपूर्ण रोड शोमध्ये जनतेने जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणा दिल्या. बंगाली संस्कृतीत माँ दुर्गेइतकेच श्रीरामांनाही महत्त्व आहे. तेथे ठिकठिकाणी श्रीरामपूर आहेत. तरीही तृणमूळच्या काही नेत्यांनी आणि अमर्त्य सेन यांनी जय श्रीराम हा काही बंगाली संस्कृतीचा भाग नसल्याचा दावा केला होता. त्याला जय श्रीरामच्या प्रचंड जयघोषातून खणखणीत प्रत्युत्तर दिले.
जे. पी. नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. लोकशाहीत प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. अशा हल्ल्यांनी भाजप घाबरेल, अशा भ्रमात तृणमूळच्या नेत्यांनी आणि गुंडांनी राहू नये. आम्ही राज्यात पाय रोवल्याशिवाय राहणार नाही. उलट आम्ही अधिक जोशाने काम करून भाजपचा राज्यातील पाया मजबूत करू, असा इशारा अमित शहांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App