डॉ. माधव गोडबोले : भारताच्या नेहरू प्रणित धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते आणि भाष्यकार!!


डॉ. माधव गोडबोले यांच्या निधनाने देशाच्या राजकारणाला वळण देण्यात महत्वाचा वाटा उचललेला महत्त्वाचा एक घटक काळाच्या पडद्याआड गेला आहे किंबहूना बाबरी मशीद पतनाच्या घटनेमुळे देशाच्या राजकारणाला संपूर्णपणे वेगळे वळण लागले त्या वळणाचे सर्वात महत्त्वाचे साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. Advocates and commentators on Nehru-led secularism in India

माधव गोडबोले उत्तम प्रशासक तर होतेच परंतु त्याहीपेक्षा नेहरू प्रणित धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते आणि देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्षाचे महत्त्वाचे भाष्यकार हे त्यांचे खरे योगदान होते. बाबरी मशीद पतनाच्या कालावधीत ते केंद्रात गृहसचिव या सर्वाधिक महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते अत्यंत विश्वासू अधिकारी होते. बाबरी मशीद पतनानंतर या घटनांनी व्यथित होऊन यांनी 1993 मध्ये स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला होता.

शासनाने कोणत्याही धर्मात कोणताही हस्तक्षेप करू नये. मंदिरे – देवळे यांचे ट्रस्ट शासनाने सांगू नयेत, असे त्यांचे ठाम मत होते. किंबहुना देशाचा मुलभूत धर्मनिरपेक्ष झाडाच्या टिकवून ठेवण्यासाठी शासनाने कोणत्याही धर्मात हस्तक्षेप करू नये तसेच कोणत्याही धर्माचा शासन व्यवस्थेत हस्तक्षेप होऊ नये, असे मत ते अखेरपर्यंत आग्रहाने मांडत राहिले. यासाठी त्यांनी 1947 च्या अनंत शयनम अय्यंगार यांनी मांडलेल्या ठरावाचे उदाहरण दिले होते. राजकारणात धर्माचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी अय्यंगार यांनी घटना समितीचा ठराव मांडला होता एका मुस्लिम सदस्याच्या विरोध असे बाकी सर्व सर्वांनी या ठरावाला पाठिंबा दिला होता, याची आठवण त्यांनी करून दिली होती. परंतु नंतरच्या पंडित नेहरू इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवा तो ठराव कधीच अमलात आणला नाही. त्यानंतरच्या विविध पक्षांच्या सरकारांनी देखील या ठराव आकडे दुर्लक्षच केले अशी खंत डॉ. माधव गोडबोले यांनी व्यक्त केली होती.

मार्च १९९३ मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कामे केली होती. त्या अगोदर, त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शासनात मुख्य वित्तसचिव म्हणून काम केले होते. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत 5 वर्षे काम केले.

सेवानिवृत्तीनंतर गोडबोले यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्‍रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, राज्याचा अर्थसंकल्प पारदर्शी व सहज समजण्याजोगा बनवण्यासाठीची एक-सदस्यीय समिती, आंध्र प्रदेश सरकारची सुशासन समिती व केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती अशा काही सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामे पाहिली.

माधवराव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तके लिहिली आहेत.

माधवराव गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके :

  • The Babri Masjid-Ram Mandir Dilemma : An Acid Test for Indian Constitution
  • The Changing Times : A Commentary on Current Affairs
  • The God who Failed – An Assessment of Jawaharlal Nehru’s Leadership
  • Good Governance : Never on India’s Radar
  • The Holocaust of Indian Partition – An Inquest
  • India’s Parliamentary Democracy on Trial
  • Indira Gandhi : An Era of Constitutional Dictatorship
  • Industrial Dispersal Policies – A Case Study oh Maharashtra
  • The Judiciary and Governance in India
  • Public Accountability and Transparency : Imperatives of Good Governance
  • Public Expenditure in Maharashtra – A Case for Expenditure Strategy
  • A Quest for Good Governance
  • Rural Employment Strategy – A quest in the Wilderness
  • Secularism : India at a Crossroad
  • Unfinished Innings : Recollections and Reflections of a Civil Servant (मराठीत – अपुरा डाव)
  • इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
  • कलम ३७० आग्रह आणि दुराग्रह
  • नव्या दिशा बदलते संदर्भ
  • प्रशासनाचे पैलू, खंड १
  • प्रशासनाचे पैलू,
  • लोकपालाची मोहिनी
  • सत्ता आणि शहाणपण लेखसंग्रह
  • सार्वजनिक जबाबदारी व पादर्शकता; सुशासनाचे अत्यावश्यक घटक
  • सुशासन हे दिवास्वप्नच

Advocates and commentators on Nehru-led secularism in India

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात