वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये समाजकार्य करुन प्रसिद्धीच्या झोतात आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पोचले आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही कारवाई कशासाठी केली जात आहे ? याची उत्सुकता वाढली आहे. सोनू सूदच्या कार्यालयाची अधिकारी का पाहणी करत आहेत, असाही प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. Actor Sonu Sood’s Mumbai office Inspection by Income Tax Department officials; Curiosity among fans as to why the action
दिल्ली सरकारने शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून सोनू सूदची निवड केली. त्यानंतर आज प्राप्तिकर विभागाचे अधिकारी कार्यालयात पोचले आहेत.
सोनू सूदला यावेळी राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीने भेट झाल्यासंबंधी विचारण्यात आले होते. यावेळी त्याने राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितलं होतं. आम आदमी पक्षातील नेत्यांच्या भेटीनंतर सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.
४८ वर्षीय सोनू सूद लॉकडाउनमुळे जास्त चर्चेत आला. अनेक परप्रांतीयांना सोनू सूदने त्यांच्या घऱी पोचविण्याचं काम केले. अनेकांच्या जेवणासोबत राहण्याची, रोजगाराचीही त्याने व्यवस्था केली. या समाजकार्यामुळे सोनू सूदवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला तसेच या गोष्टीकडे राजकीय रंगही दिला जात होता. यामुळे त्याच्या राजकारणातील चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, सोनू सूदने नेहमीच या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं आहे.
कारवाई कशासाठी ? गूढ वाढले
प्राप्तिकर विभागाने सोनू सूद याच्या बँक खात्यात गडबड असल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचे समजते. त्याचे कार्यालय आणि अन्य पाच ठिकाणी अधिकारी पोचल्याचे व्रत आहे. आता नेमके काय हाती लागते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App