विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्यामुळे शाळा सुरु करता येणे शक्य नसल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलयं . त्याचबरोबर अभ्यासक्रमाची पुस्तकं PDF स्वरुपात तयार करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीद्वारे शिक्षण दिलं जाणार असून शुल्क आकारणीबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली आहे. Academic year begins in the state! Corona cannot start school; Important statement by Varsha Gaikwad regarding fees
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. 11 वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याची तयारी झाली आहे. तर 12वी परीक्षा रद्द झाल्यानंतर निकाल लावण्यासाठी मूल्यांकन केलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
शिक्षकांनी सोमवारी केलेल्या आंदोलनाची माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांशी या शिक्षकांना रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याबाबत चर्चा केली आहे, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.
10वी पाठोपाठ 12वी च्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय 11 जून रोजी जारी करण्यात आला आहे. बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या 12वी परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुधारित मूल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App