सातवा वेतन आयोग : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची DA सह ‘ही’ मागणी होणार पूर्ण

प्रतिनिधी

मुंबई : येत्या 19 नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील इतर प्रश्नांवरुन राजकीय खडाजंगी होणार यात काहीच वाद नाही. पण या अधिवेशनात होणा-या निर्णयाकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष अधिक लागले आहे. या अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकडे सरकारचा कल असेल, असे सूत्रांकडून समजत आहे. 7th Pay Commission: ‘This’ demand of Maharashtra state government employees will be fulfilled with DA

या मागण्यांवर निर्णय होण्याची शक्यता 

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात देखील 4 % ची वाढ करण्याचा निर्णय या अधिवेशनात होण्याची चिन्हे आहेत. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतही अधिवेशनात चर्चा होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.



कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

देशातील पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित कर्मचारी महासंघाने देखील राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

15 नोव्हेंबर पर्यंत राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत तर राज्यभर राज्य कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

7th Pay Commission: ‘This’ demand of Maharashtra state government employees will be fulfilled with DA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात