वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना मास्क बंधनकारक केला आहे. मात्र अनेकजण नियम तोडतात. अशा नागरिकांवर मुंबई महापालिकेने कारवाई करून दंड वसूल केला. त्यामुळे पालिकेला 55 कोटी रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. 55 crore deposited in municipal treasury due to Mumbaikars not wearing masks; Andheri, Kurla recovered the most fines
अनेक बाबतीत मुंबई पालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. पण मास्क न घालणाऱ्यांमुळे पालिकेच्या खजिन्यात भर पडली आहे. पालिकेनं मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत तब्बल 55 कोटी रुपये वसूल केले आहेत.
पालिकेनं आतापर्यंत 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपये वसूल केलेत. एप्रिल 2020 ते 23 मे 2021 पर्यंत 418 दिवसांच्या कालावधीत ही दंडाची वसूली पालिकेतर्फे करण्यात आली आहे.
कारवाई दृष्टिक्षेपात..
1 ) एकूण लोक : 27 लाख 58 हजार 649 जण
2)अंधेरी पश्चिम वॉर्डात : 1 लाख 87 हजार 810 जणांकडून 3 कोटी 79 लाख 95 हजार 600 रुपये दंड वसूल
3) कुर्ला प्रभागात 1 लाख 38 हजार 718 जणांकडून 2 कोटी 79 लाख 13 हजार 500 रुपये दंड वसूल
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App